मृत वाघीण महाराष्ट्राची सीमा पार करून मध्यप्रदेशात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

देवलापार वन परिक्षेत्रात 10 डिसेंबर 2019 ला वाघ मरण पावल्याचे निदर्शनास आले. वाघ कसा मरण पावला यासह इतर चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून या क्षेत्राचे वनपालांनी विश्‍वासात घेतले. वाघाला खवासा बिटमध्ये नेऊन टाकण्याचे निर्देश दिले. त्यानुसार इतर वन मजुरांच्या सहकार्याने करवाई गावातील निवासी लक्ष्मण तेकाम यांच्या बैलगाडीमध्ये वाघिणीचे शव ठेवून त्याच दिवशी रात्री खवासा बिटमधील कक्ष क्रमांक आर 332 मध्ये नेऊन फेकला.

नागपूर : मध्यप्रदेश शिवनी जिल्ह्यामधील पेंच व्याघ्र प्रकल्पातील टी 19 (शर्मीली) या वाघिणीच्या शिकार प्रकरणात देवलापार वन परिक्षेत्रातील वनमजूर धामसिंह खंडातेला मध्यप्रदेशातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. चौकशी दरम्यान, खंडाते यांनी एका वनकर्मचाऱ्यांने मरण पावलेल्या वाघाला खवासा बीटमध्ये नेऊन टाकण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. या प्रकरणात अनेक त्रुटी असल्याचे दिसत आहे. यात आंतरराज्य समन्वय नसल्याचेही उघडकीस आले आहे. यामुळे दोन्ही राज्यातील वनाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - वर्ध्यात चक्‍क शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

देवलापार वन परिक्षेत्रात 10 डिसेंबर 2019 ला वाघ मरण पावल्याचे निदर्शनास आले. वाघ कसा मरण पावला यासह इतर चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून या क्षेत्राचे वनपालांनी विश्‍वासात घेतले. वाघाला खवासा बिटमध्ये नेऊन टाकण्याचे निर्देश दिले. त्यानुसार इतर वन मजुरांच्या सहकार्याने करवाई गावातील निवासी लक्ष्मण तेकाम यांच्या बैलगाडीमध्ये वाघिणीचे शव ठेवून त्याच दिवशी रात्री खवासा बिटमधील कक्ष क्रमांक आर 332 मध्ये नेऊन फेकला. 11 डिसेंबरला वाघ मरण पावल्याची घटना खवासा येथील वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. दरम्यान, वाघाचा मृत्यू कसा झाला याचा तपास शिवनी वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आर.एस. कोरी यांनी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घटनास्थळावर दोन ते तीन व्यक्तीच्या पायाच्या आणि बैलगाडीच्या खूणा आढळल्या. त्यानुसार तपास सुरू केला असता वाघिणीला महाराष्ट्रातून आणून टाकल्याची माहिती मिळाली. तपासाला गती दिली असता संशयीतांची नावे समोर आली. दरम्यान, संशयीत आरोपी 31 जानेवारीला दुपारी खवासाकडे खासगी कामासाठी दुचाकीने येत असलेल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सापळा रचून संशयीत आरोपी खंडाते याला सापळा रचून अटक केली. मात्र, दुचाकीवर बसलेला दुसरा व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतल्यानंतर खंडाते यांनी वाघिणीला मध्यप्रदेशात आणून टाकल्याचे कबूल केले. मात्र, दोन्ही राज्यातील वनाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. या तपासात अनेक त्रुटी असल्याने याचा महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांनीही तपास करण्याची गरज आहे असे बोलले जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead body of tigress in Mahrashtra forest found in Madhyapradesh