धक्कादायक! वर्ध्यात चक्क शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

ती आज नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.

हिंगणघाट - नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्‍कादायक घटना घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका आहे, ती आज नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.

सविस्तर वाचा - अन त्याने फेकले तिच्या अंगावर गरम पाणी

त्याचवेळी तिथुन जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि या मार्गाने जाणाऱ्या इतर युवकांनी तिला विझवून येथील उपजिल्हा रुग्णांलयात दाखल केले, तरुणी गंभीररित्या भाजली असून प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणात संशयित म्हणून विकेश नगराळे रा. दारोडा या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burning attack on professer ledy in Wardha