प्रसूती होईपर्यंत आईला समजले नाही मुलगी गर्भवती आहे, हे आहे कारण...

दिलीप गजभिये
Monday, 24 February 2020

मुलीने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. मात्र, आईने याकडे दुर्लक्ष केले. कारण, मुलीला वायगुळाचा (ऍसिडीट) त्रास होता. यामुळे नेहमी तिचे पोट सुजत होते व उलटी होत होती. मुलगी सतत पोट दुखत असल्याचे सांगत असल्याने आईचा संशय बळावला व गर्भवती असल्याचे समजले.

खापरखेडा (जि. नागपूर) : एकाच गावातील रहिवासी असलेल्या युवकाने अल्पवयीन मुलीला (वय 16) प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलगी घरी एकटी असल्यावर युवकाने तिच्या घरी जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार संबंध झाल्याने मुलीला गर्भधारणा झाली. मुलीने सातव्या महिन्यात घरीच मृत बाळाला जन्म दिला. बाळ जन्माच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी रात्री प्रसूत अल्पवयीन मातेचा मृत्यू झाला. फाटा उर्फ रूपेश संतोष उईके (वय 19, रा. वॉर्ड न. 4, इंदिरानगर आबादी, खापरखेड) असे आरोपी युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रूपेश व मृत हे एकमेकांच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर राहतात. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनेक महिन्यांपासून त्यांचे प्रेम सुरू होते. प्रेमात अकंठ बुडालेल्या दोघांनी सिमा ओलांडली आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार झालेल्या संबंधांमुळे मुलगी गर्भवती झाली.

सविस्तर वाचा - तू दुसऱ्याशी लग्न करू नको; माझ्याशी संबंध ठेव, तुझा व मुलीचा पूर्ण खर्च उचलतो

मुलीने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. मात्र, आईने याकडे दुर्लक्ष केले. कारण, मुलीला वायगुळाचा (ऍसिडीट) त्रास होता. यामुळे नेहमी तिचे पोट सुजत होते व उलटी होत होती. मुलगी सतत पोट दुखत असल्याचे सांगत असल्याने आईचा संशय बळावला व गर्भवती असल्याचे समजले. अचानक त्रास वाढला व मुलीने मृत बाळाला जन्म दिला. यानंतर प्रसूत आईची प्रकृती अधिकच खराब झाल्याने नागपुरातील मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, बाळ दगावल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्रीच्या सुमाराच तिचा मृत्यू झाला. आईने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी खापरखेडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

देवलापार येथून आरोपीला अटक

गर्भवती मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच आरोपी रूपेशने गावातून पळ काढला. पोलिसांनी रूपेशला रविवारी देवलापर येथून अटक केली. आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोराडी, खापरखेडा येथे चोरी, डकेती आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

अवश्य वाचा - तुमचा विश्‍वास बसेल का? आईचे दूध पिल्याने बाळाचा मृत्यू, काय असेल कारण...​

मृताचा भाऊ व आरोपी मित्र

मृत मुलीचा भाऊ व आरोपी रूपेश हे मित्र आहेत. तसेच रूपेश हा चुलत मामेभाऊ आहे. त्यामुळे रूपेशचे नेहमी घरी येणे-जाणे होते. यातूनच रूपेशची ओळख मुलीशी झाली. यानंतर दोघांचे प्रेम झाले. मुलीच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून रूपेश घरी जात होता. यातूनच हा संपूर्ण प्रकार घडला. 

पोटफुगीच्या त्रासामुळे समजलेच नाही 
मुलगी गर्भवती असल्याचे घरच्यांना समजलेच नाही. कारण, तिला ऍसिडीटीचा त्रास होता. मुलीने घरीच मृत बाळाला जन्म दिला. आम्ही मुलीच्या आईचे बयाण नोंदवल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. 
- चंद्रकांत काळे, 
पोलिस निरीक्षक, खापरखेडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of baby and mother born in Nagpur district