खेळता खेळता अचानक दोरी गळ्यात अडकली अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

मुलाच्या ओरडण्यामुळे घरातील सदस्य बाहेर आला. त्यांना प्रकार लक्षात घेताच हर्षच्या गळ्याचा फास काढण्यात आला. त्याला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच हर्षचा मृत्यू झाला होता.

 नागपूर : पाळण्यावर खेळत असताना आठ वर्षीय मुलाला पाळण्याच्या दोरीचा अचानक फास लागला. गळा जोरात आवळला गेल्याने मुलगा बेशुद्ध झाला. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हर्ष विलास सांगोळे असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. पाळण्याचा गळफास लागून मृत्यू पावल्याची गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे, हे विशेष. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास सांगाळे हे पत्नी व मुलगा हर्ष यांच्यासह लावा येथील गंगोत्री ले-आउटमध्ये राहतात. रविवारी दुपारी चार वाजता ते घरात बसले होते तर मुलगा हर्ष हा पोर्चमध्ये असलेल्या पाळण्यावर खेळत होता. खेळताना पाळण्याची दोरी हर्षच्या गळ्यात अडकली. त्याने आटापिटा करीत सोडविण्याचा प्रयत्न केला असता दोरीचा फास आवळल्याने हर्षचा श्‍वास रोखला गेला. 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण 

मुलाच्या ओरडण्यामुळे घरातील सदस्य बाहेर आला. त्यांना प्रकार लक्षात घेताच हर्षच्या गळ्याचा फास काढण्यात आला. त्याला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच हर्षचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यापूर्वी 16 मे रोजी नंदनवनमधील एका 8 वर्षीय मुलीचासुद्धा पाळण्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of child