"आम्हालाही हवा ॲप्रन"; सामाजिक अधिक्षकांची मागणी; रंगाबाबत एकमत नाही 

Demand of White Apron by social superintendents in Nagpur
Demand of White Apron by social superintendents in Nagpur

नागपूर ः  डॉक्टर  म्हंटले की, डोळ्यासमोर एक विशिष्ट चित्र उभं राहतं. पांढरा शुभ्र ॲप्रन घातलेली व्यक्ती. डॉक्टरांचं हे चित्र मनात ठसलेलं आहे. पण अलिकडे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत साऱ्यांना ॲप्रन हवा आहे. परिचारिका ॲप्रन घालतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञही ॲप्रन घालतात. आता मेडिकलमध्ये कार्यरत सामाजिक अधिक्षकांनाही (वैद्यकीय) ॲप्रन हवा असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, त्यांची ही मागणी तुर्तास पुर्ण झाली आहे. मात्र यांनाही पांढऱ्या रंगाचाच ॲप्रन हवा असल्याने प्रशासनासमोर थोडा पेच निर्माण झाला आहे. 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(मेडिकल) कार्यरत सोशल वर्कर यांच्या पदनामात पाच-सहा वर्षांपुर्वी बदल केला. सामाजिक अधिक्षक (वैद्यकीय) असे पदनाम बदलण्यात आले. 

आता सामाजिक अधिक्षकांनी रुग्णांचे समुपदेशन करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, यांचे वेगळेपण रुग्णांना कळावे यासाठी त्यांची ॲप्रनची मागणी पुर्ण करण्यात आली. मात्र रंगावरून प्रशासन आणि सामाजिक अधिक्षक यांचे एकमत होत नाही. यापुर्वी काही वर्षांपुर्वी पचारिकांनी गणवेश बदलासोबतच ॲप्रनची मागणी केली. त्यांना पांढरा ॲप्रन घालण्याची मंजूरी दिली. त्यावेळी अनेक रुग्णांना परिचारिका याच डॉक्टर आहेत, असा संभ्रम निर्माण होत असे. 

अलिकडेही हा अनुभव अनेकांना येतो. यामुळेच प्रशासनाने सामाजिक अधिक्षकांना वेगळा पांढरा रंग वगळता दुसरा निवडावा असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रात पांढऱ्या रंगाचे पावित्र्य राखले जावे असा सल्लाच जणू सामाजिक अधिक्षकांकडून दिला आहे.

रुग्णांना येणाऱ्या अडचनी सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्याची जबाबदारी सामाजिक अधिक्षकांकडे आहे. ते योग्यरित्या ही जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना हेच सामाजिक अधिक्षक आहेत, अशी ओळख तत्काळ व्हावी , तत्काळ समस्या सुटावी यासाठी त्यांनी केलेली ॲप्रनची मागणी पुर्ण केली. मात्र रंगावरून संभ्रम निर्माण झाला आहे. अलिकडे परिचारिका, तंत्रज्ञ हे सारे पांढरा ॲप्रन घालतात. यामुळे डॉक्टर कि नर्स असा संभ्रम निर्माण होतो. सामाजिक अधिक्षकांच्या बाबतीतही हा संभ्रम शक्य आहे. यामुळे वेगळा रंग असावा. 
डॉ. अविनशा गावंडे, 
वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल, नागपूर.

संपदान - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com