esakal | घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
sakal

बोलून बातमी शोधा

reaction of infant died in bhandara district hospital fire

बाळ गमावणाऱ्या कुटुंबांनी येथील रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचा बेजबाबदारपणा कथन केला. हातात पैसाचा कागद दिला. पण आमची लेक तर गेली. आमचं बाळ तर गेलं. मात्र, यापुढे इतर माता आमच्यासारख्या दुर्दैवी ठरू नये, हा सूर या माताच्या वेदनांतून व्यक्त झाला. 

घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : 'आमच्या रंजल्या-गांजल्यांच्या तुटक्या-फुटक्या संसारात आनंद घेऊन आलेल्या कोवळ्या जीवांना फुलण्यापूर्वीच रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे अग्नी देण्याची वेळ आमच्यावर आली. हातावर आणणं आणि पानावर खाणं, असं जिणं असतं आमचं. आमी दरिद्री. पैसा नाही, म्हणून सरकारी रुग्णालयात येतो. पर इथं बी गरिबायच्या जिंदगीची किंमत नाही. गरिबायनं मेलं काय न जगलं काय, यायले काही देणं-घेणं नाही', या भावना व्यक्त करतानाच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. ही दुर्दैवी कहाणी आहे, भंडारा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या लेकींच्या दुर्दैवी बापांची. त्यांना आपल्या लेकीचा साधा चेहराही बघता आला नाही. 

बाळ गमावणाऱ्या कुटुंबांनी येथील रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचा बेजबाबदारपणा कथन केला. हातात पैसाचा कागद दिला. पण आमची लेक तर गेली. आमचं बाळ तर गेलं. मात्र, यापुढे इतर माता आमच्यासारख्या दुर्दैवी ठरू नये, हा सूर या माताच्या वेदनांतून व्यक्त झाला. 

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

मुलीच्या जन्माचा आनंद साजराच करता आला नाही - 
अवघं २४ तासांचं वय होतं आमच्या चिमुकलीचं. चिमुकलीला जन्म दिल्यानंतर तिचे मनाप्रमाणे लाड करता आले नाही. तिचा चेहराही बरोबर बघता आला नाही. माझी पहिलीच मुलगी होती. आता काही केलं तरी मुलगी तर परत मिळणार नाही. मात्र, माझ्यासोबत जे झालं ते इतर मातांसोबत होऊ नये, असा टाहो फोडून ही महिला सांगत होती. आमचं लेकरू जाण्याची वेदना पैशात मोजता येत नाही, असे श्रीनगर येथील रहिवासी योगिता आणि विवेक धुळसे यांनी सांगितले. लेक गेल्याच्या दुःखाने कालपासून यांच्या घरी चूल पेटली नाही. तब्बल पाच तासांनी आम्हाला मुलगी जळाली असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

भंडारा जिल्ह्य रुग्णालयात दगावलेल्या कुटुंबांच्या घरी भेट दिली असता, टोलीतील हिरकन्या हिरालाल भानारकर, श्रीनगर पहेला गावातील योगिता विकेश धुळसे, जांब तालुक्यातील मोहाडी गावातील प्रियंका जयंत बसेशंकर, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीतील सुषमा पंढरी भंडारी, टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले, रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम, उसरला येथील सुकेशिनी धर्मपाल आगरे यांनी चिमुकल्यांचे कलेवर देऊन रुग्णवाहिकेतून रवाना केल्याचे सांगितले. या कुटुंबीयांनी तत्काळ आपल्या चिमुकल्यांना अखेरचा निरोप दिला. आज भेटीदरम्यान अनेक मातांनी काही क्षण बोलण्याचेही टाळले. मात्र, त्यांना समजावल्यानंतर या मातांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या साऱ्या मातांचा रोख रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांवर होता. 

हेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला

रावणवाडीतील तो बाप ठरला अभागी :  
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात १० नवजात शिशूंचा आगीत होरपळून, गुदमरून दुर्दैवी अंत झाला. या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार केल्यानंतरही वंदना मोहन सिडाम नुसतीच रडत होती. रावणवाडी येथील घरी भेट दिल्यानंतर सारा परिवार शोकाकुल होता. कोणीही एकमेकाशीही संवाद साधत नव्हते. मोठी मुलगी 'रक्षा'ला आणि वडील मोहन सिडाम यांना नुकत्याच जन्माला आलेल्या लेकीचा चेहरा बघता आला नसल्याचे सांगितले. मोहन यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधल्यानंतर त्यांना हुंदके आवरणे कठीण झाले. रात्री पोहोचलो. अखेरचा निरोप देण्याची संधीही रुग्णालयाने दिली नसल्याचा संताप व्यक्त केला. 

हेही वाचा - साखरेला येणार ‘अच्छे दिन’; खाद्य तेल, तांदूळ स्थिरावले

रुग्णालयाचा बेजबाबदारपणा - 
लग्नाला अडीच वर्षे झाली. त्यानंतर ७ डिसेंबर २०२० रोजी कविता बारेलाल कुंमरे (सालेकसा-खापा) यांना ही मुलगी झाली. लेकीचा जन्माचा आनंद साजरा केला. मात्र, वजन कमी असल्याने दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर सांगत होते की, मुलीचे वजन वाढले आहे. तिला काही दिवसात सुटी देऊ. परंतु, या रुग्णालयाने तर आमच्या मुलीला अखेरचा निरोप देण्यास भाग पाडले. पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंमरे दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनीही रुग्णालय प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवले. डायपरदेखील विकत आणून द्यावा लागत असे. यासाठी दर दिवसाला शंभर रुपये मोजावे लागत असल्याची तक्रार यावेळी बारेलाल यांनी केली. मजुरीतून दर दिवसाला १०० देणेदेखील जमत नव्हते. परंतु, लेकीसाठी दर आठ दिवसांनी हजार रुपये जमवून पत्नीकडे देत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

संपादन - भाग्यश्री राऊत

loading image