लॉकडाऊन असूनही खासगी कंपन्यांकडून विमानांचे बुकिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

गो एअरवेजनेही रात्री 8.10 वाजताची वेळ दर्शविली आहे. त्याच दिवशी मुंबईहून गो एअरचे सकाळी 6.15 आणि सायंकाळी 6.50 वाजता तर इंडिगोचे सकाळी 11.40 आणि रात्री 8.15चे विमान दर्शविण्यात आले आहे. पुण्याहून इंडिगोने दुपारी 1 व सायंकाळी 6 वाजता विमान सोडण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय कोलकाता, चेन्नई व बेंगळुरूसाठी अन्य शहराच्यामार्गे (व्हाया) विमान सोडण्याची तयारी केली आहे.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देश 14 एप्रिलपर्यंत "लॉकडाऊन' आहे. त्यानंतरही परिस्थिती निवळेल की नाही याबाबत साशंकता असतानाच खासगी विमान कंपन्यांनी 15 एप्रिलपासूनच्या विमानांसाठी बुकिंग सुरू केले. नागपूरहून मुंबई, दिल्ली, पुण्यासाठी तिकीट उपलब्ध आहे. पण, विमानसेवा पूर्ववत करण्यासंदर्भात शासनाचे अद्याप कोणतेही दिशानिर्देश नसल्याने विमान उड्डाण भरेल की नाही, यासंदर्भातील सस्पेन्स आहे.

अवश्य वाचा - CoronaVirus : ‘पीपीई कीट’ घालून करावे लागलेे अंत्यसंस्कार

देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे "लॉकडाऊन'चा अवधी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु, त्याकडे कानाडोळा करीत खासगी विमान कंपन्या व्यावसायिक संधी साधून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. इंडिगो आणि गो एअरने 15 एप्रिलपासून विमानांच्या उड्डाणाचे शेड्युल ऑनलाईनवर उपलब्ध करीत बुकिंग सुरू केले. इंडिगोच्या संकेतस्थळावर दिल्लीहून नागपूरसाठी 15 एप्रिलच्या पहाटे 5.15 आणि सकाळी 10.25 वाजता विमानाची वेळ दर्शविण्यात आली आहे.

गो एअरवेजनेही रात्री 8.10 वाजताची वेळ दर्शविली आहे. त्याच दिवशी मुंबईहून गो एअरचे सकाळी 6.15 आणि सायंकाळी 6.50 वाजता तर इंडिगोचे सकाळी 11.40 आणि रात्री 8.15चे विमान दर्शविण्यात आले आहे. पुण्याहून इंडिगोने दुपारी 1 व सायंकाळी 6 वाजता विमान सोडण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय कोलकाता, चेन्नई व बेंगळुरूसाठी अन्य शहराच्यामार्गे (व्हाया) विमान सोडण्याची तयारी केली आहे.

मुंबई, दिल्ली, पुणे सेवेची तयारी

तिकीटांचे दरही चांगलेच वाढीव दर्शविण्यात आले आहे. दिल्लीचे प्रतिव्यक्ती तिकीट 4 हजार 416 ते 6 हजार 758 रुपयांच्या घरात आहे. मुंबईचे तिकीट 5 हजार 228 ते 6 हजार 357 रुपयांच्या घरात आहे. पुण्यासाठी 8 हजार 884 रुपये मोजावे लागतील.

विमान रद्द झाल्यास परतावा नाही

विमान रद्द झाल्यास प्रवाशांना पैसे परत मिळणार नाही. तर ती रक्कम कंपनीकडे शिल्लक राहील. पुढील वर्षभराच्या काळात त्या रकमेतून प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल. तिकिटाचे शुल्क जमा राशीपेक्षा अधिक असल्यास रकमेतील फरक प्रवाशांना भरून द्यावा लागणार आहे. यामुळे प्रवाशांनी नीट विचार करूनच बुकिंग करणे आपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the lockdown, private companies start booking flights