भयंकर! पांघरायला ब्लँकेट न दिल्याने ढाबा मालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

आरोपी हा भांडी धुण्याचे काम करतो. तो मूळचा बिहारचा आहे. ढाब्यावर काम करून तो तेथेच राहायचा. कामात चूक झाल्यास मालक त्याला नेहमी रागवायचा. याचा राग त्याच्या मनात होता. ढाबा मालकही कामगारांसोबत ढाबा परिसरातच राहात होता. सोमवारी रात्री मालक व आरोपीमध्ये वाद झाला.

नागपूर : छोट्या छोट्या गोष्टींवरून गंभीर गुन्हे घडल्याचे आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. नागपूर जिल्ह्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका किरकोळ कारणावरून कामगाराने रागाच्या भरातआपल्या मालकालाच संपवले. ही घटना ग्रामीण भागातील देवलापार पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी पहाटे घडली. 

प्रकाश बालगोविंद जयस्वाल (५३) रा. वडम्बा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी कारा सत्यनारायणसिंग बावर (३५) याला अटक केली. प्रकाश जयस्वाल यांचा वडंबा गावाच्या रस्त्यावर शिवप्रकाश जयस्वाल नावाने ढाबा आहे.

देवलापार येथील घटना
या ठिकाणी आरोपी हा भांडी धुण्याचे काम करतो. तो मूळचा बिहारचा आहे. ढाब्यावर काम करून तो तेथेच राहायचा. कामात चूक झाल्यास मालक त्याला नेहमी रागवायचा. याचा राग त्याच्या मनात होता. ढाबा मालकही कामगारांसोबत ढाबा परिसरातच राहात होता. सोमवारी रात्री मालक व आरोपीमध्ये वाद झाला.

तुकाराम मुंढेंनी आदेश देताच नागपूरच्या या डाॅनच्या बंगल्यावर चालला बुलडेजर... गुन्हेगार...

त्यानंतर ढाबा बंद करून सर्वजण झोपायला गेले. त्यावेळी जयस्वाल यांनी आरोपीला पांघरायला ब्लँकेट दिला नाही. या रागात त्याने लाकडी काठीने मालकावर हल्ला केला. इतर सहकारी मालकाला वाचवण्यासाठी धावले असता त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. यात जखमी होऊन जयस्वाल यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकुटे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhaba owner murder in nagpur district