नागपुरात पुन्हा महापौर-आयुक्तांमध्ये वाद? पोर्चमध्ये गाडी पार्क केल्याचे कारण

राजेश चरपे
Tuesday, 27 October 2020

एकीकडे महापौर तर दुसरीकडे आयुक्त आहेत. दोघेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्हाला या वादात ओढू नका असे येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यातसुद्धा एका विषयावरून महापौर व आयुक्तांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे समजते.

नागपूर : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये सोमवारी गाडी ठेवण्यावरून महापौर आणि महापालिका आयुक्तांमध्ये वाद झाला. त्यामुळे महापौरांनी बाजार विभागाच्या बैठकीला जाण्याचे टाळल्याचे समजते. या संदर्भात महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना फोन ‘डायव्हर्ट’ करून ठेवण्यात आला होता.

बाजार विभागाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत बैठक बोलावण्यात आली होती. महापौर आल्यानंतर इमारतीच्या पोर्चमध्ये त्यांची गाडी पार्क करून ठेवण्यात आली होती. थोड्याच वेळाने आयुक्त राधाकृष्ण आले.

अधिक माहितीसाठी - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

पोर्चमध्ये उभी असलेली गाडी त्यांनी चालकास हटवण्यास लावली. एवढेच नव्हे तर यापुढे येथे गाडी लाऊ नका असेही चालकाच बजावले. ही बाब चालकाने महापौरांच्या कानावर घातली. त्यामुळे महापौरसुद्धा चिडले. त्यामुळे त्यांनी बैठकीलाच जाण्याचे टाळले.

गाडीच्या पार्किंगवरून रंगलेल्या वादाची महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा होती. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. आम्हाला महापालिकेत नोकरी करायची आहे.

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात

एकीकडे महापौर तर दुसरीकडे आयुक्त आहेत. दोघेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्हाला या वादात ओढू नका असे येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यातसुद्धा एका विषयावरून महापौर व आयुक्तांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे समजते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between mayor and commissioner over parking in porch