esakal | ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले
sakal

बोलून बातमी शोधा

Bees attack funeral procession in Chandrapur

काही वेळानंतर काही लोकांनी हिंमत दाखवून मृतदेह विसाव्यावरून उचलला व काही अंतरावर नेऊन तो ट्रॅक्‍टरने स्मशानभूमीत पोहोचविला. यानंतर नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पाडले. मात्र, जखमी मुले व नातलगांना रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे मुलांना आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार पार पाडता आले नाही.

...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

sakal_logo
By
राहुल मैंद

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : मधमाशांचा हल्ला कोणावरही होऊ शकतो. अगदी गिर्यारोहकांना/प्रस्तरारोहकांना तसेच पर्यटकांनाही मधमाशा कडाडून चावल्या आहेत. मात्र, चंद्रपुरात भलताच प्रकार पुढे आला आहे. अंत्ययात्रेत सहभागी लोकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने मृतदेह विसाव्यावर सोडून नागरिकांना गावाकडे पळ काढावा लागला. थोडक्यात सांगायचे झाले तर मधमाशा कोणालाही केव्हाही चावू शकतात. हेच या प्रकरणावरून सिद्ध होते.

चंद्रपूर जिल्‍ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील रहिवासी कोंडबा महागू वाटगुरे (वय ६५) यांचे तीन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. पत्नी, मुली, मुले, नातलग व नागरिकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. गावाच्या वेशीवर विसाव्यावर अंतिम धार्मिक सोपस्कारासाठी मृतदेह ठेवण्यात आला.

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा

मात्र, याच वेळेस अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे सर्वांना मृतदेह जागीच सोडून पळ काढावा लागला. मधमाशांनी हल्ला करताच उपस्थितांमध्ये एकच धावपळ झाली. नागरिक व महिलांनी कसेबसे गाव गाठले.

काही वेळानंतर काही लोकांनी हिंमत दाखवून मृतदेह विसाव्यावरून उचलला व काही अंतरावर नेऊन तो ट्रॅक्‍टरने स्मशानभूमीत पोहोचविला. यानंतर नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पाडले. मात्र, जखमी मुले व नातलगांना रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे मुलांना आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार पार पाडता आले नाही. यात मृताच्या दोन मुलांसह अन्य पाच नातलग जखमी झाले.

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

मधमाशांनी पुन्हा दिले वेदनेचे चटके

अंतिम यात्रा म्हटले की मृताच्या नातलगांसाठी दु:खी आणि वेदनांची अशी प्रवास यात्रा. मात्र, याच अंतिम यात्रेवर मधमाशांनी हल्ला केल्याने मृताच्या दोन मुलांसह अन्य पाच जवळच्या नातलगांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. यामुळे वेदनादाई अंतिम यात्रेत मधमाशांनी पुन्हा वेदनेचे चटके दिले. परिसरात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.

अशी दुसरीही घटना

पुणे येथील पुरंदर तालुक्यातही काही दिवसांपूर्वी अंत्यविधीवेळी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात वीस जण जखमी झाले होते. माजी उपसभापती नीलेश जगताप यांच्यासह अनेक वाटसरूंना मधमाशा चावल्या होत्या. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top