मला लाच मागितली... आता मी काय करू?, तक्रार कुठे करू? सांगा

अनिल कांबळे
Friday, 4 September 2020

फलकामध्ये आपले कायदेशीर काम करण्यासाठी लाच मागितल्यास आपण खालील कार्यालयाशी संपर्क साधा असे जनतेस आवाहन करण्यात आले आहे. त्याखाली पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक नमूद करण्यात आले आहे.

नागपूर : शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी काम करून देण्याचा मोबदला म्हणून मला लाच मागितली. लाच द्यायची नाही, पण नाही दिल्यास काम अडून राहील. लाचखोर कर्मचाऱ्याची तक्रार कुठे करावी? कशी करावी? खरचं त्याच्यावर कारवाई होईल काय? असा अनेकांना प्रश्‍न पडतो. अशा प्रश्‍नाचे उत्तर थेट एसीबीने शोधून काढले आहे. शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात एसीबी भ्रष्टाचारविरोधी फलक लावणार आहे.

भ्रष्टाचारास पायबंद घालण्यासाठी लोकांनी पुढे यावे, म्हणून नागपूर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत आवाहन करणारे फलक सर्व पोलिस ठाण्याच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. मावळते पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

फलकामध्ये आपले कायदेशीर काम करण्यासाठी लाच मागितल्यास आपण खालील कार्यालयाशी संपर्क साधा असे जनतेस आवाहन करण्यात आले आहे. त्याखाली पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक नमूद करण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी चार वाजता पोलिस आयुक्त कार्यालयात आवाहनाचे फलक वितरित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने व विक्रम साळी यांना फलक वितरित केले. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार हे उपस्थित होते.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

फलकामध्ये ‘भ्रष्टाचार थांबविणे हे तुमच्या हाती आहे. भ्रष्टाचार नष्ट केला तरच देश मजबूत होऊ शकतो, लाच घेणे आणि देणे हा गंभीर गुन्हा आहे. देशाच्या विकासाला खीळ घालणारा भ्रष्टाचार आपण सगळे मिळून नष्ट करू. आपले कायदेशीर काम करण्यासाठी लाच मागितल्यास आपण खालील कार्यालयाशी संपर्क साधा’ असे जनतेस आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of anti-corruption billboards in Nagpur