सुदृढ प्रकृतीमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, आता या भ्रमात राहू नका

Don’t be under the illusion that a healthy nature won't make you a corona
Don’t be under the illusion that a healthy nature won't make you a corona

नागपूर : कोणत्याही व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. सुदृढ प्रकृतीमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, या भ्रमात राहू नका. कोरोनापासून बचावासाठी नियमांचे पालन करा, असा सल्ला डॉ. अश्विनी तायडे आणि आयएमए महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष डॉ. वंदना काटे यांनी दिला.

महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोविड रुग्णांसाठी ‘कोविड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमातून त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिले. लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. काही लोक हे जाणीवपूर्वक बेजबाबदारपणे वागत इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. सद्यःस्थितीत शहरासह संपूर्ण देशात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक बातमी - स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला माहितीये? डॉक्टरांपुढे निर्माण झाला होता उपचाराचा गंभीर प्रश्न

चाचणी केली त्यांनाच पॉझिटिव्ह असल्याचे समजले जात आहे. मात्र, चाचणी न करणाऱ्यांचा सगळीकडे वावर सुरू आहे. ही बाब भीतीदायक आहे. त्यामुळे मास्क लावणे हा कोरोनापासून दूर राहण्याचा प्रभावी उपाय आहे. याशिवाय दर तासाला हात धुणे, बाहेर असल्यास हँड सॅनिटायजरचा वापर करणे आणि महत्त्वाचे म्हणजे शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

डॉ. वंदना काटे यांनी अतिसौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करण्याचा सल्ला दिला. स्वत:च्या मताने औषध घेऊ नका किंवा ताप, सर्दी अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम, योग, प्राणायाम करा, याशिवाय व्हिटॅमिन सी आणि डीचे सेवनही आरोग्यास उपायकारक आहे. कोणताही त्रास असल्यास किंवा आजार असल्यास व्यायाम, योग किंवा प्राणायाम करू नये, असाही सल्ला त्यांनी दिला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com