esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Don Santosh Ambekar was released from Corona

डॉन संतोष आंबेकरला गेल्या 20 दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर मध्यवर्ती कारागृहातील विशेष कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती बिघडल्याने आंबेकरला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आंबेकरची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली होती.

डॉन संतोष आंबेकरला मिळाला हा मोठा दिलासा, वाचा काय झाले ते... 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकरला कोरोना झाला होता. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉनची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली असून, त्याची पुन्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. 

कारागृहातून मिळालेल्या माहितीनुसार, डॉन संतोष आंबेकरला गेल्या 20 दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर मध्यवर्ती कारागृहातील विशेष कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती बिघडल्याने आंबेकरला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आंबेकरची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आंबेकरला कारागृहातील विशेष कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकताच आंबेकरची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने तो सध्या कारोनामुक्‍त झाला. 

हेही वाचा - 'ती' म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही...
 

विशेष सेलमध्ये रवानगी 

डॉन आंबेकरला क्राईम ब्रॅंचने पाच महिन्यांपूर्वी अटक केली होती. गुजरातच्या व्यापाऱ्यांची पाच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यासोबत त्याच्यावर एका डॉक्‍टर युवतीवर आणि एका बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच सराफा व्यापाऱ्याला गंडविल्याचाही आरोप डॉन आंबेकरवर आहे. सध्या आंबेकरला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहेत. 
 

राजा गौसही निगेटिव्ह 

कुख्यात गांजा आणि पिस्तूल तस्कर असलेल्या राजा गौसलाही कोरोना झाला झाला होता. त्याच्यावर मध्यवर्ती कारागृहातील कोविड विशेष सेलमध्ये उपचार सुरू होते. राजा गौसचीही तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे गौसही कोरोनामुक्‍त झाला. राजा गौसने 2013 मध्ये नागपूर पोलिसांवर गोळीबार केला होता. तसेच त्याच्याकडून पाच पिस्तूल जप्त करण्यात आल्या होत्या. नागपुरात रोशन समरित या युवकाचा खूनही राजाने केला होता. उत्तरप्रदेशातील प्रतापगड शहरात राजा गौस आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. 

वृद्धेच्या घरी दोन लाखांची चोरी 

पाचपावली ठाण्यांतर्गत चोरांनी एका वृद्धच्या घरातील रोकड आणि दागिन्यांवर हात साफ केला. या प्रकरणी पोलिसांनी पहिले रेल्वे फाटक, पाचपावली निवासी कुसुम पांडुरंग दिवटे (73)च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.  कुसुम इमारतीच्या पहिल्या माळ्यावर राहतात. शुक्रवारी रात्री घराचा दरवाजा उघडाच राहिला होता. मध्यरात्रीला चोरट्याने शिरून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख 70 हजार रुपये असा एकूण 2 लाख रुपयांच्या मालावर हातसाफ केला. सकाळी 5.30 वाजता कुसुम यांची झोप उघडल्यावर घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

संपादित : अतुल मांगे 
 

go to top