esakal | 'ती' म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही... 
sakal

बोलून बातमी शोधा

Molestation Husband and wife girlfriend

आरोपी रामकिशन जांगीड (वय 40) आणि त्याची पत्नी सरोज (वय 35) अशी बलात्कार करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. रामकिशन हा फर्निचर तयार करण्याचे मोठे कंत्राट घेतो. 2013 मध्ये ते अजनीत राहणारी पीडित महिला मीना (बदललेले नाव) हिच्या घरी भाड्याने राहायला आले.

'ती' म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही... 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : समलैंगिक असलेल्या महिलेने आपल्या घरमालकीणीशी मैत्री केली. पतीपासून विभक्‍त असलेल्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला समलैंगिक संबंधाची चटक लावून दिली. त्यानंतर कट रचून मैत्रिणीला पतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतर "ती म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही बायको आहेस', आमच्या दोघांशीही पत्नीप्रमाणे शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अन्यथा तुझे सोशल मीडियावर "ब्ल्यू फिल्म' व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली. असा प्रकार नागपुरात घडला असून पीडित मैत्रिणीने पोलिसात धाव घेत मैत्रिणी आणि तिच्या पतीविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामकिशन जांगीड (वय 40) आणि त्याची पत्नी सरोज (वय 35) अशी बलात्कार करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. रामकिशन हा फर्निचर तयार करण्याचे मोठे कंत्राट घेतो. 2013 मध्ये ते अजनीत राहणारी पीडित महिला मीना (बदललेले नाव) हिच्या घरी भाड्याने राहायला आले. मिना पतीपासून विभक्‍त राहत होती. रामकिशनची पत्नी सरोज समलैंगिक असल्याने तिने मीनाशी मैत्री केली. तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पती बाहेर गेल्यानंतर तिच्याशी ती समलैंगिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होती. त्या संबंधाची मीनालाही चटक लागली. 

त्यामुळे दोघीही एकमेकींच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होत्या. परंतु, सरोजच्या मनात काही औरच होते. तिने मीनाशी लग्न करण्याचा विचार आपल्या पतीला सांगितला. पतीनेही तिला होकार देत एक अट ठेवली. "जर ती पत्नीप्रमाणे माझ्याशीही शारीरिक संबंध ठेवेल, तर तुम्हाला लग्नाची परवानगी देईल.' ही अट मीनाला पटणारी नव्हती. त्यामुळे रामकिशन आणि सरोजने एक रचला. पतीला बाहेरगावी जाण्याचे नाटक करण्यास सांगितले. रात्रीला मीनाला घरी झोपायला बोलावले. शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना पतीला इशारा केला आणि घरात बोलावले. 

"दोघींनाही नको त्या अवस्थेत' बघितले. रामकिशनने दोघींच्याही कानाखाली वाजवून मीनाच्या आईवडील आणि भावाला बोलवून सांगण्याची धमकी दिली. लगेच सरोजने पतीला समजावण्याचे नाटक केले. "जर मीना मला शारीरिक संबंध प्रस्थापित करू देत असेल तर मी कुणालाही सांगणा नाही,' अशी अट ठेवली. सरोजने मीनाची समजूत घालून पतीशी संबंध प्रस्थापित करण्यास राजी केले. या संबंधाची सरोजने मोबाईलने शूटिंग केली. 
 

ब्लॅकमेलिंगसाठी सर्व नाटक 


मीनाशी रामकिशनने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी सरोज देत होती. त्यामुळे नाइलाजाने मीनाला रामकिशन आणि सरोजशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागत होते. सरोज विकृत मानसिकतेची असल्याने मीनाला ती शारीरिक त्रास देत होती. अनैसर्गिक संबंधामुळे मीनाची प्रकृती बिघडली. 
 

दोघांचाही पत्नी म्हणून स्वीकार 


मीनाकडून स्टॅंपपेपरवर सरोजची पत्नी म्हणून लिहून घेतले. त्यानंतर मीनाला तिचे घर सोडण्यासाठी रामकिशन आणि सरोज यांनी बाध्य केले. तिला स्वतःच्या घरात पत्नी म्हणून दोघांनीही स्वीकार केला. तिचे पूर्वीप्रमाणेच पती-पत्नीने लैंगिक शोषण सुरू केले. या संबंधाला कंटाळून मीनाने थेट पोलिस स्टेशन गाठले. पती-पत्नीविरुद्ध तक्रार दिली.