esakal | होळी असली तरी...करू नका हे काम, नाहीतर...
sakal

बोलून बातमी शोधा

Drunkdriving.

रस्त्यावर लोखंडी कठडे उभारण्यात येऊन दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. कुणी वाहनचालक मद्याच्या अमलाखाली मिळून आल्यास त्याचे वाहन जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

होळी असली तरी...करू नका हे काम, नाहीतर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : होळी आणि रंगपंचमीनिमित्त संपूर्ण शहरात बंदोबस्त लावण्यात आला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थेवर यावेळी भर दिला आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला असून येत्या दोन दिवस हे पथक डीडी कारवाईसाठी सज्ज असणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी शहरात 580 होळींचे दहन होणार आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदोबस्तात 5 पोलिस उपायुक्त, 8 सहायक पोलिस आयुक्त, 38 पोलिस निरीक्षक, 203 सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 2023 पुरुष आणि 292 महिला शिपायांना तैनात करण्यात आले आहे.
होळीनिमित्त काही गडबड होऊ नये यासाठी गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली. अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वात गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी परिमंडळनिहाय पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. वाहतूक शाखेच्या वतीनेसुद्धा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी घातपातविरोधी पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

मद्यपी वाहनचालक रडावरवर
होळीनिमित्त अनेकजण दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालीत वाहने चालवित असतात. मद्याच्या अंमलाखाली रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी चौकाचौकांत पोलिस पथके तैनात करण्यात आली आहे. मद्याच्या अमलाखाली गोंधळ करताना कुणी दिसून आल्यास त्याची थेट पोलिस ठाण्यात रवानगी करण्यात येणार आहे. याशिवाय रस्त्यावर लोखंडी कठडे उभारण्यात येऊन दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. कुणी वाहनचालक मद्याच्या अमलाखाली मिळून आल्यास त्याचे वाहन जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

बिट मार्शल सतर्क
संबंधित ठाण्याच्या बिट मार्शल यांनादेखील सतर्क करण्यात आले असून त्यांना नेमून दिलेल्या परिसरात नियमित पॅट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. होळीच्या दिवशी मद्याची दुकाने बंद असल्याने अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. उद्या सोमवारपासून अवैध दारू विक्रेत्यांची धरपकड सुरू होणार आहे. काही दारूविक्रेते भूमिगत झाले असले तरी पोलिस त्यांच्या अड्ड्यावर लक्ष ठेवून आहेत. दारूचे दुकाने बंद असून दारूविक्री करणाऱ्यांवर छापेमारी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा - जादुटोणा केल्याचा संशय आला आणि उचलले टोकाचे पाऊल

दामिनी पथक तयार
कुणीही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. कुणाशी वाद होईल, अशाप्रकारे कुणीही होळी खेळू नये. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा. नागरिकांना होळीच्या शुभेच्छा.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त.