esakal | ब्रेकिंग : भूकंपाच्या दुहेरी धक्क्यांनी सिवनी जिल्हा हादरला
sakal

बोलून बातमी शोधा

The Double earthquake shook the Sivani district

भूकंपाचा पहिला धक्का जाणवला, तेव्हा परिसरातील बहुतांश नागरिक गाढ झोपेत होते. त्यामुळे बहुतांश जणांना धक्के जाणवले नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भूकंप झाल्याची वार्ता पसरताच चर्चेला उधाण आले.

ब्रेकिंग : भूकंपाच्या दुहेरी धक्क्यांनी सिवनी जिल्हा हादरला

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्हा रविवारी पुन्हा भूकंपाच्या दुहेरी धक्क्यांनी हादरला. सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का मध्यरात्रीच्या सुमारास १ वाजून ४५ मिनिटांनी बसला. या भूकंपाचे केंद्र नागपूरच्या उत्तर-ईशान्य दिशेला मध्यप्रदेशातील सिवनी येथे जमिनीच्या दहा किमी आत होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी नोंदविण्यात आली, जो सौम्य प्रकारात मोडतो.

त्यानंतर सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा २.७ तीव्रतेचा सौम्य धक्का बसला. या दोन्ही धक्क्यांमुळे कसलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. भूकंपाचा पहिला धक्का जाणवला, तेव्हा परिसरातील बहुतांश नागरिक गाढ झोपेत होते. त्यामुळे बहुतांश जणांना धक्के जाणवले नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भूकंप झाल्याची वार्ता पसरताच चर्चेला उधाण आले.

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

सकाळी चर्चा सुरू असतानाच आणखी एक हलका धक्का जाणवला. नागपूर शहरात भूकंपाचा प्रभाव जाणवला नाही. मात्र, सिवनी जिल्ह्यातील नागरिकांना थोडाफार धक्का बसल्याची माहिती आहे. एक महिन्यात सिवनी परिसराला बसलेला हा तिसरा धक्का होय. यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी ३.३  तीव्रतेचा भूकंप झाला होता.

संपादन - नीलेश डाखोरे