हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

विश्‍वपाल हजारे
Sunday, 22 November 2020

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती दिघोरी पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दिघोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचारानंतर चारही जणांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, जखमी विवाहितेचा उपचारापूर्वी वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

लाखांदूर (जि. भंडारा) : पत्नी व मुलांसोबत रात्री दुचाकीने दिघोरी/मोठी येथे जाताना कोदामेंढीजळ भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी विवाहितेचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह वडील गंभीर जखमी झाले आहेत. मृताचे नाव सुषमा दिलीप रोकडे (वय ३५) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर येथे राहत असलेले दिलीप रोकडे बुधवारी रात्री दुचाकीने त्यांचे मुळ गाव असलेल्या दिघोरी/मोठी येथे जात होते. कोदामेंढी शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील रोकडे कुटुंबीय हवेत उसळून रस्त्यावर कोसळून जखमी झाले.

हेही वाचा - खुशखबर! आता बिनधास्त करा गोड पदार्थ; किरकोळ बाजारात गूळ झाला स्वस्त

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती दिघोरी पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दिघोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचारानंतर चारही जणांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, जखमी विवाहितेचा उपचारापूर्वी वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या अपघातात दिलीप श्‍यामराव रोकडे (वय ४०), सूरज दिलीप रोकडे (वय १०) आणि वंश दिलीप रोकडे (वय सात) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिघोरी पोलिसांनी या घटनेची नोंद करून आरोपी चालक दर्शन संजय मेश्राम (वय ३०) याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

जाणून घ्या - स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न, श्री दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंद

रस्ता दुरुस्तीमुळे वाढले अपघात

लाखांदूर-सानगडीदरम्यान दोन वर्षांपासून रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याचे काम बऱ्याच काळापासून रेंगाळले असून, अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या वर्दळीमुळे सतत धूळ उडते. त्यामुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies in accident at Bhandara district