पत्नी पाणीपुरीच्या ठेल्यावर, संशयाने केला घात आणि फोडले तोंड

अनिल कांबळे
Wednesday, 28 October 2020

प्रदीप वानखेडे (३५) रा. नारा घाट, झोपडपट्टी असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप वानखेडे हा रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत घरी येत होता.

नागपूर  ः चौकातील ठेल्यावर पाणीपुरी खाताना पत्नी दिसली... पतीने तिच्याकडे रागाने बघितले... घरी आल्यावर गंमत दाखवतो... असे बोलून घरी पोहचला... पतीच्या दहशतीत असलेली पत्नी घरी पोहचली...  ‘तुझ्यासोबत पाणीपुरी खात असलेला युवक कोण?’ अशी विचारणा पत्नीला केली.. पत्नीने कुणी ग्राहक पाणीपुरा खात असावा... असे उत्तर देताच तिच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनचे पत्नीला जबर मारहाण करीत तोंड फोडले. 

ही घटना जरीपटक्यात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप वानखेडे (३५) रा. नारा घाट, झोपडपट्टी असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप वानखेडे हा रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत घरी येत होता.

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात
 

त्यावेळी प्रदीपला चौकातील एका ठेल्यावर पत्नी रितू पाणीपुरी खाताना दिसली. त्याच वेळी तेथे अन्य एक युवकही पाणीपुरी खात होता. त्याने बाईक थांबवली आणि पत्नीला ‘पटकन घरी हो’ अशी धमकी दिली. पत्नी घरी येताच त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.

‘तू पर पुरुषासोबत पाणीपुरी खात होती’ असा आरोप करीत संशय व्यक्त केला. आरोपी प्रदीपने रागाच्या भरात तोंडावर, पाठीवर, छातीवर, पोटावर मारून केस ओढले. तसेच सेंट्रींगच्या पाटीने मनगटावर मारून हात फ्रॅक्चर केला. गंभीर जखमी झालेल्या पत्नीने पोलिस ठाणे गाठून पती विरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubt to character of wife, cracked her mouth