esakal | तुम्ही कोणत्या हक्‍काने "रिपाइं' या शब्दाचा वापर करता... कोणी केला हा प्रश्‍न उपस्थित?
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Mohanlal Patil will go to the Supreme Court against Election Commission

केंद्रीय मंत्री रामदास आठवले डॉ. मोहनलाल पाटील यांच्याच रिपाइं (ए) या पक्षाचे अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाकडे या पक्षाचे सर्वाधिकार पाटील यांच्याकडे असल्याने आठवले यांना नवा पक्ष काढावा लागला. त्यानंतरही ते रिपाइं शब्दप्रयोग करीत होते. यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आली होती. परंतु, आता कायद्याने त्यांना रिपाइं शब्द वापरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पाटील यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.

तुम्ही कोणत्या हक्‍काने "रिपाइं' या शब्दाचा वापर करता... कोणी केला हा प्रश्‍न उपस्थित?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाला खिंडार पडले आहे. फुटीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नव्याने "रिपाइं' शब्दाचा वापर केला. मात्र, कायद्याने 2014 मध्ये झालेल्या निर्णयामुळे त्यांना या शब्दाचा वापर करता येत नाही. यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याचा दावा रिपाइं(ए)चे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी केला.

अवश्य वाचा - मित्रांसह ती गेली ढाब्यावर; पार्टी ठरली शेवटची!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले डॉ. मोहनलाल पाटील यांच्याच रिपाइं (ए) या पक्षाचे अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाकडे या पक्षाचे सर्वाधिकार पाटील यांच्याकडे असल्याने आठवले यांना नवा पक्ष काढावा लागला. त्यानंतरही ते रिपाइं शब्दप्रयोग करीत होते. यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आली होती. परंतु, आता कायद्याने त्यांना रिपाइं शब्द वापरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पाटील यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.

आठवले जुने मित्र आहेत, परंतु भाजपला पाठिंबा दिल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार पक्षाची भूमिका बदलली. तरी आठवले भाजपच्या समर्थनार्थ जाहीरपणे वक्तव्य करतात. त्यांच्या या मताचे पक्ष समर्थन करीत नाही. पक्षाचे ए.बी. फॉर्म वाटपाचे अधिकार आपल्याकडे आहेत, असा दावा डॉ. मोहनलाल यांनी केला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी नव्या दमाच्या तरूणांना एकत्र करून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. पक्षाचा लवकरच नागपुरात कार्यकर्ता मेळावा होईल. पत्रकार परिषदेला रिपाइं (ए-आंबेडकर)चे शहराध्यक्ष विनोद थूल, सतीश तांबे, सोपान बेताल उपस्थित होते.

आठवलेंना मीच अध्यक्ष केले

मीच रिपाइं(ए)चा अध्यक्ष होतो. मित्र असल्याने विद्यमान केंद्रीय मंत्री आठवलेंना अध्यक्ष केले. पक्षाच्या संसदीय मंडळात तसा निर्णय घेतला. जुने पॅंथर असल्याने त्यांच्यासोबत होतो. आजही मित्रत्व कायम आहे. परंतु, काही निर्णयावर मतभेद आहेत. आठवलेंना निवडणूक आयोगाकडे पक्षाबद्दल काही बदल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वत:चा नवा पक्ष काढला आहे. त्यांच्या पक्षाबद्दल आपल्या शुभेच्छा आहेत. मात्र,ते कायद्यानुसार झालेल्या बदलानुसार "रिपाइं' असा शब्दप्रयोग वापरू शकत नाही. निवडणूक आयोगानेच त्यांना तसे स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाविरुद्ध आपण न्यायालयात गेलो असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

go to top