हे लेकाचे बामनं आम्हाला अक्कल शिकवतील काय?

Nitin-Raut
Nitin-Raut

नागपूर : जे स्वतः परदेशातून आले, ते लेकाचे बामनं आम्हाला अक्कल शिकवतील काय? ते म्हणतील का आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून? हे कदापि खपवून घेणार नाही आणि होऊही देणार नाही, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिमांनी नेता मानले असते आणि बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जाऊन मुस्लिमांनी हिंदुस्थान म्हणणे सोडले असते. तर मुस्लीमांना हातबोट लावण्याची कुणाचीही ताकद नव्हती, असे म्हणत मुस्लीमांना भारत म्हणायला लाज वाटते का, असा प्रश्‍न त्यांनी केला.

मुस्लीम बांधवांनी हिंदुस्थान म्हणणे सोडले पाहीजे

गत रविवारी 8 मार्चला महिलादिनाचे औचित्य साधून डॉ. राऊत यांचा पहीलाच नागरी सत्कार घेण्यात आला. फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी ब्राह्मणांवर सडकून टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला प्रथम भारतीय आणि अखेरपर्यंत भारतीय, असे म्हटले होते. मुस्लीम बांधवांनी हिंदुस्थान म्हणणे सोडले पाहीजे, असे सांगताना त्यांनी कॉंग्रेसवरही आडून टीका केली. डॉ. राऊत म्हणाले, मी कॉंग्रेसचा नेता असल्याने दिल्ली येथे अनेक लोक भेटायला येत असतात. त्यांना वाटते, आपल्या आंबेडकरी चळवळीचा माणूस आहे, जो कॉंग्रेसमध्ये आजही आंबेडकर जिवंत ठेवून उभा ठाकलेला आहे.

व्हिडीओ राज्यभर व्हायरल

डॉ. राऊत यांच्या वक्तव्यांनी संविधानातील शपथेच्या प्रथेलाच नख लागल्याची भावना व्यक्त होत आहे. कॉंग्रेस पक्षाने या देशात सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा विरोध केला आहे. कॉंग्रेसने 2010 साली जो एनपीआर आणला होता. त्या अटी जशाच्या तशा ठेवल्या तरच लागू होईल, असे कॉंग्रेसचे धोरण होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे विरोध आहे, असे सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा संदर्भ देऊन बोलताना डॉ. राऊत म्हणाले. ब्राह्मणांवर शेलक्‍या भाषेत टीका केल्याचा त्यांचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल होत असल्याने नाराजी पसरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com