दारूला शोधला हा पर्याय, दारुड्यांची नवी शक्‍कल

Drunk sanitizer instead of alcohol
Drunk sanitizer instead of alcohol

नागपूर : दारूबंदी असल्याने बेवड्यांनी नवीनच शक्‍कल काढली. नशा करण्यासाठी दारूऐवजी चक्‍क हॅंड सॅनिटायझर विकण्याची आयडिया काढली. एवढेच नव्हे तर दारूसारखीच नशा येत असल्याचा दावा आणि प्रचार-प्रसारही त्या शक्‍कलबाजाने केला. हा प्रकार लक्षात येताच शांतीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री सॅनिटायझर विक्रेता व चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले.

आशू हुकूमचंद गुप्ता (30, रा. शांतीनगर), आकाश मनोज गुप्ता (28), रा. किल्ला रोड, महाल, सुशील बाबूराव झंझाड (28), रा. खैरीपुरा, लालगंज, शेख अशफाक शेख आसिफ (25), रा. कळमना व अय्याज अली फैयाज अली (32), रा. शांतीनगर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशू हुकूमचंद गुप्ता मास्टरमाइंड असून, त्याच्या डोक्‍यातून दारूच्या नावावर नशेसाठी सॅनिटाझर विकण्याची शक्‍कल बाहेर आली. त्याची चहाटपरी असून लॉकडाउनमुळे सध्या तो बेरोजगार आहे. सध्या हॅंड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच सॅनिटायझरमध्ये 70 ते 80 टक्‍के अल्कोहोल असल्याचेही आशूच्या लक्षात आले. त्याने थेट दारू पिणाऱ्यांना गाठून दारूऐवजी सॅनिटायझर पिऊन दारूसारखा नशा करण्याचा पर्याय सांगितला. सॅनिटायझरचे काही दुष्परिणाम नसल्याचे सांगत होता आणि 250 मि.लि. ची सॅनिटायझरची बॉटल 200 ते 250 रुपयांत विकत होता.


सोमवारी रात्री शांतीनगर पोलिसांना माहिती मिळाली. आशू सोमवारी रात्री पटेल कंट्रोलच्या गल्लीत संशयास्पद स्थितीत दिसून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या रॉयल अल्कोहोल हॅण्डरबच्या दोन बॉटल मिळाल्या. अन्य आरोपींनी ते आशूकडे दारू खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आशू व अन्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आशूच्या घराची तपासणी केली असता सॅनिटायझरच्या 46 बाटल्या व दारूची एक बाटली असा एकूण 4 हजार 340 रुपयांचा माल मिळाला.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध दारूबंदी कायदा, राष्ट्रीय आपत्ती कायदा व जमावबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कवडू उईके, पोलिस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, पोलिस हवालदार वकील, जाधव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com