esakal | गृहिणींची चिंता वाढली! थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो वगळता भाजीपाला वधारला
sakal

बोलून बातमी शोधा

Due to the cold snap vegetables except tomatoes grew

थंडी कमी होताच भाव घसरण्याची शक्यता आहे. सध्या स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीची आवक सुरू असल्याने भाव आवाक्यात असून हीच स्थिती फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

गृहिणींची चिंता वाढली! थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो वगळता भाजीपाला वधारला

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात भाजीची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे टोमॅटो वगळता सर्वच भाज्यांचे भाव किंचित वाढलेले आहेत. थंडी कमी होण्याची शक्यता लक्षात घेता काही दिवसांत पुन्हा भाजीचे भाव घसरतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कळमना बाजार आणि महात्मा फुले मार्केट परिसरात सध्या १५० ते १७५ भाजीच्या गाड्याची आवक सुरू आहे. ती मागणीच्या तुलनेत कमी असल्याने भाजीपाला खाण्याच्या सुगीच्या दिवसात भावात किंचित वाढ झालेली आहे. घाऊक बाजारात भावात किंचित वाढ झालेली असली तरी किरकोळ बाजारात मात्र, विक्रेते ग्राहकांचा खिसा हलका करीत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा हलका होऊ लागला आहे.

अधिक माहितीसाठी - पेन, पेन्सिल बघून सूचली कल्पना अन् तयार केला चक्क बाराशे मीटर उडणारा ड्रोन

दहा रुपये किलो असलेले टोमॅटो किरकोळ बाजारात ३० रुपये किलो तर दहा रुपये किलो असलेली मेथी चाळीस रुपये किलो दराने विकली जात आहे. थंडी कमी होताच भाव घसरण्याची शक्यता आहे. सध्या स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीची आवक सुरू असल्याने भाव आवाक्यात असून हीच स्थिती फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

भाजीपाला प्रति किलोचे दर (रुपये)
टोमॅटो १०
वांगे २० ते २५
फुलकोबी १५
पानकोबी ०८
चवळीच्या शेंगा ३०
कारले ३०
गवार शेंगा ३०
पालक
मेथीची भाजी १०
कोहळा ३०
शिमला मिरची ४०
कोथिंबीर २०
भेंडी ३०
दुधी भोपळा १०
काकडी २०
मुळा १०
गाजर २०
तोंडले ३०

संपादन - नीलेश डाखोरे

go to top