केवळ शंभर रुपये द्या आणि प्रवासासाठी ई-पास घ्या, कुठे आणि कुणी सुरू केला हा धंदा?

E-pass is available in Nagpur for Rs hundred
E-pass is available in Nagpur for Rs hundred

नागपूर : लॉकडाउन आणि संचारबंदी लागू असल्याने नारिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्‍यक सेवेसाठी पोलिसांकडून वाहतूक ई-पास देण्यात येत आहेत. यामुळे पास मिळविण्यासाठी नागरिकांची चागलीच गर्दी होत असते. नागरिकांकडून पास मिळविण्यासाठी नानाविध कारणे सांगण्यात येतात. मात्र, पोलिस त्यांना हुळकावून लावतात. यामुळे पास मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. याचाच लाभ घेत एका उच्चशिक्षित युवकाने "केवळ शंभर रुपये द्या आणि प्रवासासाठी ई-पास घ्या' असा गोरखधंदा सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शरद सावळे (वय 35, रा. शारदा चौक, जुना शुभेदार ले-आउट) यांची सावळे हिस्टॉलॉजी वर्क्‍स लेबॉरेटरी पॅथॉलॉजी लॅब आहे. त्याच्या प्रयोगशाळेत बुलढाणा येथील डॉ. अजित सिरसाट यांच्याकडून नमुने तपासणीसाठी येत असतात. ते नमुने तपासल्यानंतर अहवाल त्यांना पाठवायचा असतो. संचारबंदीच्या काळात नागपूर-बुलढाणा असे ये-जा करण्यासाठी पोलिस वाहतूक पासची आवश्‍यकता असते. 

त्यांनी माहिती काढली असता अंकुश गणेशराव मेतकर (27, रा. कोकरे ले-आउट, अयोध्यानगर) याने जी.एम. टेक्‍निकॉम सर्विसेस नावाच्या नेट कॅफेवरून पास बनवून मिळत असल्याचे समजले. त्यांनी संपर्क केला असता आरोपीने ऑनलाईन माहिती भरली व सायंकाळी 100 रुपये घेऊन त्यांना एक पास दिली. ते आपला मित्र जयंत गोगटे (रा. म्हाळगीनगर) यांच्यासह आपल्या एमएच-31, डीव्ही-9192 क्रमांकाच्या कारने 19 मे ला सकाळी 7 वाजता बुलढाणा येथे जाण्यासाठी निघाले असता आनसिंग फाटा, वाशीम येथे त्यांना पोलिसांनी अडवले. 

केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर पाठविले

या ठिकाणी आरोपींनी पासवरील बारकोडची तपासणी केली असता ती पास वैभव मेश्राम यांची असून ती नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी मिळालेली असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर सावळे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी उच्चशिक्षित असून, ऑनलाईन पीडीएफमध्ये बदल करून बनावट पास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. आतापर्यंत त्याने शेकडोंना ई-पास बनवून केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर पाठविल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com