esakal | अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती
sakal

बोलून बातमी शोधा

A minor girl gave birth to a boy

दिसायला सुंदर असणाऱ्या मुलीला पाहून गावातील युवक तिच्या मागे लागले. तिला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी व बोलण्यासाठी हे युवक सतत मामाच्या घरी चकरा मारीत होते. यातील एका युवकाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 

अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

sakal_logo
By
अशोक काटकर

दारव्हा (जि. यवतमाळ) : गावात एखादी मुलगी आली रे आली की, गावातील मुलांची नजर तिच्यावर जाते. मग सलगी वाढविण्यासाठी हे दिवाने प्रयत्न करतात. सतत मुलीच्या मागे लागतात. तिला आकर्षित करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून करण्यात येतो. सतत स्टाईल मारण्यापासून कोणतेही काम करून देण्यासाठी तयार असतात. अशीच एक अल्पवयील मुलगी सुटीत मामाच्या घरी राहायला गेली. मात्र, गावातील युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि गर्भवती केले. त्या अल्पवयीन मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी सुटीच्या दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्‍यातील लोही येथे राहणाऱ्या मामाच्या घरी राहायला आली होती. दिसायला सुंदर असणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी व बोलण्यासाठी  युवक सतत मामाच्या घरी चकरा मारीत होते. यातील एका युवकाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

जाणून घ्या - पत्नी बनली रणचंडिका; पतीच्या प्रेयसीला धु..धु धुतले... वाचा काय झाले ते

युवकाच्या आमिषाला बळी पडल्यानंतर तिने सर्वस्व वाहून दिले. सात जून ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत दोघांनी सतत शारीरिक संबंध प्रस्थापिक केले. सतत ठेवलेल्या शारीरिक संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. यानंतर मुलगी कुटुंबासह कामानिमित्त पुणेला गेली. तिथे कुटुंबीयांनी तिची प्रसूती केली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 

पुणे पोलिसांनी केले प्रकरण वर्ग

मागाच्या घरी राहायला आलेल्या मुलीला गावातील युवकानी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवनू सतत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने पुण्यात गोंडस बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सीसीटीएनएसवर गुन्हा नोंद झाला. दारव्हा पोलिस ठाण्यात मेल पाठवून मातृत्व लादणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

क्लिक करा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी, नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

अल्पवयीन मुली होतात टार्गेट

वयात आलेल्या मुलींना आता युवकांकडून टार्गेट केले जात आहे. या मुलींना समाजात कसे वावरावे लागतात याची जाण नसते. यामुळे टवाळखोर युवक त्यांच्या मागे लागून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आकर्षण आणि अन्य काही गोष्टींमुळे मुलीही मुलाच्या आमिषाला बळी पडतात. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलीही मोठ्या विश्‍वासाने आपले सर्वस्व देऊन बसतात. मात्र, नंतर पश्‍चात्ताप करण्याचीच वेळ येते. नातेवाईक देखील बदनामीपोटी तक्रार करीत नाही. 

मुलीच्या तक्रारीवरून दारव्हात गुन्हा दाखल

मामाच्या घरी सुटीत आलेल्या अल्पवयीन मुलीला गावातील युवकाने प्रेमजाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात गर्भवती राहिलेल्या मुलीने मुलाला जन्म दिला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून लोही येथील तरुणाविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.