esakal | धोकादायक! कोरोनाचा हृदयाच्या पेशींवर परिणाम; हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगताप यांचा महत्वाचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Effect of corona on heart cells

कोरोना संदर्भात समाजात हवी तशी जनजागृती आजही झालेली दिसून येत नाही. एखादी शहराबाहेरील व्यक्ती रुग्णालयात काम करते म्हणून घरमालक त्याला घरी येउ देत नाही तर दुसरीकडे कोरोना होईल म्हणून काही लोकांनी स्वत:लाच अनेक महिन्यांपासून घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार पुढे येत आहे. ही गंभीर बाब आहे.

धोकादायक! कोरोनाचा हृदयाच्या पेशींवर परिणाम; हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगताप यांचा महत्वाचा सल्ला

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाचा हृदयावर परिणाम होऊ शकतो हे आपल्याकडे आता सिद्ध झाले आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांनी कोरोनाचा हृदयाच्या पेशींवर परिणाम होत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले. कोरोनाबाधितांमध्ये जास्त जोखमीचे लक्षणे असताना त्यांच्या प्रतिकारशक्तीचा प्रभाव हृदयावर होतो. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे ॲसिडिटी, छातीत दुखणे असा त्रास होत असल्यास काळजी न करता शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी दिला.

महापालिकेच्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात डॉ. प्रशांत जगताप यांनी ‘कोव्हिड आणि हृदय’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला कोरोना हा फुफ्फुसाचा आजार समजले जात होते. आज मात्र त्यातील संशोधनाने तो रक्तवाहिन्यांमधील आजार असल्याचे निष्पन्न झाले. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने त्याचा प्रभाव फुफ्फुसासह, हृदय आणि मेंदुवरही पडतो. त्यामुळेच हृदयविकार आणि अर्धांगवायूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

अधिक वाचा - "आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?

कोरोना संदर्भात समाजात हवी तशी जनजागृती आजही झालेली दिसून येत नाही. एखादी शहराबाहेरील व्यक्ती रुग्णालयात काम करते म्हणून घरमालक त्याला घरी येउ देत नाही तर दुसरीकडे कोरोना होईल म्हणून काही लोकांनी स्वत:लाच अनेक महिन्यांपासून घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार पुढे येत आहे. ही गंभीर बाब आहे.

कोरोना होतो म्हणून आपण रोजचे व्यायाम बंद केले आहेत. सकाळी फिरणे बंद केले आहेत. त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर पडत आहे. आज सुरक्षेसह सकारात्मक विचारांची जास्त गरज आहे. नित्याचे काम करताना सुरक्षा घेणे अत्यावश्यक आहेच, शिवाय सकारात्मक विचार करणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचविणेही तेवढेच गरजेचे आहे, असेही डॉ. जगताप म्हणाले.

अधिक माहितीसाठी - #SundaySpecial : ‘झणझणीत सावजी मटण’ खाल्ल ना... वाचा मग कसा झाल जन्म

हृदयासाठी वेळ द्या

व्यायामाने हृदय आणि मेंदूला सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे नियमांचे पालन करताना व्यायाम आणि फिरण्याकडे दुर्लक्ष करू नका. रोज किमान २५ मिनिटे चाला. याशिवाय रोज ७ ते ९ तास शांत झोप, संतुलीत आहार घ्या. ८ ते १० ग्लास पाणी प्या, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी, फळांचा रस, सूप प्या. कोणत्याही गोष्टींचा ताण घेऊ नका. त्यामुळे हृदय निरोगी राहील. नित्यक्रमातून स्वत:साठी आणि आपल्या हृदयासाठी वेळ काढा, असा सल्लाही डॉ. जगताप यांनी दिला.

संपादन - नीलेश डाखोरे