
संचारबंदी असतानाही केवळ मनोरंजनासाठी नरसाळा भागातील एका शेतात काही लोकांनी कोंबड्यांची झुंज लावली. तसेच यावर जुगार खेळण्यात येत होता. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : कोरोना... कोरोना हे नाव कानावर पडले तरी मनात भीती निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना निष्फळ ठरत आहेत. दुसरीकडे लॉकडाउनमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, याचा काही लोकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. असाच एक विचित्र प्रकार नागपुरातील नरसाळा भागात घडला.
देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या तीन-चार दिवसांत संपणार आहे. हा लॉकडाउन संपणार की वाढणार, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. लॉकडाउनमुळे कोरोनावर काहीअंशी नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आले आहेत. त्यामुळे लॉकडाउन वाढण्याचे संकेत देण्यात आले होते. लॉकडाउन वाढला तर नक्कीच वाढणाऱ्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
हेही वाचा - ते शौचास जायला निघाले, पायऱ्यांवर पाय ठेवताच जोरजोरात ओरडू लागले...
मात्र, या लॉकडाउनला काही नागरिकांकडून विरोधही होत आहेत. हाताला काम नसल्याने जगायचे कसे असा प्रश्न मोलमजुरी, व्यवसाय, शेतकरी, मजूर आदींना पडत आहेत. दुसरीकडे लॉकडाउन वाढला तर आपली नोकरी गेल्याशिवाय राहणार नाही, असा विचार नोकरी करणाऱ्यांचा मनात येत आहेत. यामुळे लॉकडाउन वाढला पाहिजे की नाही, याबाबत त्यांच्या मनात प्रश्न आहे. मात्र, याचा काही लोकांना कोणताच फरक पडत नसल्याचे शहरात घडलेल्या या घडनेवरून दिसून येते.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाले आहेत. अत्यावश्यक असल्याशिवाय कुणीही घराबाहेर निघू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र, काही जणांनी याला सकारात्म घेतल्याचे दिसून येत नाही. संचारबंदी असतानाही केवळ मनोरंजनासाठी नरसाळा भागातील एका शेतात काही लोकांनी कोंबड्यांची झुंज लावली. तसेच यावर जुगार खेळण्यात येत होता. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नरसाळा गावापासून आउटर रिंगरोडकडे जाणाऱ्या मार्गावरील नागपुरे यांच्या शेतात कोंबड्यांची झुंज सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकून कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या आठ आरोपींना अटक केली. यात अरुण कोकर्डे (57), परमेश्वर चिकटे (32), दीपक चिकटे (28) तिन्ही रा. तरोडी, दीपक चकोले (41, रा. दिघोरी चौक), राजेंद्र निमजे (52, रा. म्हाळगीनगर), श्याम नागपुरे (52, रा. गोविंदनगर, नरसाळा), प्रभाकर नैताम (65, रा. नरसाळा), बाबाराव नागपुरे (45, रा. नरसाळा) यांचा समावेश आहे. शेतमालकाचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
गुन्हेशाखा युनिट क्रमांक चारचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना कोंबड्यांची झुंज सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दुपारी सापळा रचून नागपुरे यांच्या शेतावर छापा टाकला. पोलिसांनी आरोपींची धरपकड करीत त्यांच्याकडून एकूण 41 हजार 150 रुपये रोख, कोंबड्यांच्या पायाला बांधण्यात येणाऱ्या 12 काती, सहा मोबाईल, आठ वाहने व कोंबडे असा एकूण 22 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन आणि जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा - सायंकाळी जंगलात गेलेल्या युवकासोबत घडली थरारक घटना, मग...
केवळ मनोरंजनासाठी कोंबड्यांची झुंज लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. मनोरंजनासाठी प्राण्यांशी खेळणे गुन्हा आहे. कोणत्याही प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून कोंबड्यांच्या झुंजीवर सरकारने बंदी घातली आहे. तरही लपून कोंबड्यांची झुंज लावली जाते. पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कोंबड्यांची झुंज काही बंद होताना दिसत नाही. आता तर हदच झाली. देशात संचारबंदी असताना असा प्रकार पुढे आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.