मृत्यूसत्र थांबेना : अबतक ४२०, कोरोनामुक्त होण्याचा दरही घसरला

केवल जीवनतारे
Friday, 14 August 2020

अनलॉकनंतर जनता कर्फ्यूला जनतेने भरभरून साथ दिली. यामुळे लॉकडाउनची टांगती तलवार दूर झाली. मात्र, कोरोनाबाधितांचा उद्रेक वाढला आहे. दर दिवसाला दोन आकड्यात मृत्यू होत आहेत. सुरुवातीला नियंत्रणात असलेला कोरोना हाताबाहेर गेला कसा, याकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

नागपूर : नागपुरातील कोरोनाच्या बाधेने मृत्यूचा आकडा फुगत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गुरुवारी १८ जण कोरोनाच्या बाधेने दगावले. तसेच ७२७ बाधितांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ७०९ वर पोहोचला आहे. नागपुरात ४२० बळींची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा सामूहिक प्रादुर्भाव झाला असल्यामुळेच कोरोनाच्या मृत्यूंमध्ये प्रचंड वाढ होत आहे. मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, समन्वयाचा अभाव असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अनलॉकनंतर जनता कर्फ्यूला जनतेने भरभरून साथ दिली. यामुळे लॉकडाउनची टांगती तलवार दूर झाली. मात्र, कोरोनाबाधितांचा उद्रेक वाढला आहे. दर दिवसाला दोन आकड्यात मृत्यू होत आहेत. सुरुवातीला नियंत्रणात असलेला कोरोना हाताबाहेर गेला कसा, याकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. मेयो रुग्णालयात दहा जण दगावले आहेत. तर मेडिकलमध्येही ११ जण दगावले आहेत. यात दोन मृतदेह कोरोनाबाधित आढळून आले असल्याची नोंद आहे.

जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

मेयो-मेडिकलमध्ये १८ जण दगावले आहेत. मेयो दगावलेल्यांमध्ये गांधीबाग येथील ६२ वर्षीय, हिवरीनगर येथील ६२ तर गांजाखेत येथील ७० वर्षीय महिलांचा समावेश आहे. या तीन महिलासह सदर आझादनगरातील ६५ वर्षीय व्यक्ती, लालगंज येथील ४३ वर्षीय इसम, महाल बडकस चौकातील ७३ वर्षीय वृद्ध तर तांडापेठ येथील ६६ वर्षीय व्यक्ती कोरोनाच्या बाधेने मृत्यू पावले आहेत. याशिवाय विनोबा भावेनगर येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

११ हजार ७०९ बाधितांपैकी ५ हजार ५६१ रुग्ण बरे

कोरोनाबाधितांवर प्रारंभी उपचार होत असताना काळजी घेतली जात असे. परंतु, कालातंराने बाधितांच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याने मृत्यूदरात वाढ झाली असावी अशी चर्चा आहे. यामुळेच दर दिवशी कोरोनामुक्तांच्या दरात घसरण होत आहे. महिनाभरापूर्वी ६८ टक्के बरा होणाचा दर आता ४७.११वर आला आहे. आतापर्यंत ११ हजार ७०९ कोरोनाबाधितांपैकी ५ हजार ५६१ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारच्या तुलनेत बरा होण्याचा दर गुरुवारी एक टक्क्याने खाली आला आहे.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

डॉक्टर, परिचारिका पॉझिटिव्ह

आत्तापर्यंत वैद्यकीय आणि मेयोच्या डॉक्टर आणि परिचारिका पॉझिटिव्ह आल्या आहेत. परंतु, आता कोविड सेंटरचे डॉक्टर आणि परिचारिका पॉझिटिव्ह येऊ लागल्या आहेत. बुधवारी व्हीएनआयटी कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली. त्यामध्ये ८ डॉक्टर, ३ परिचारिका, १ डेटा एंट्री ऑपरेटरसह एकूण १४ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या सर्वांना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह येणारे बहुतेक डॉक्टर व परिचारिका शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या आहेत.

असे आहेत मृत्यू

  • मेडिकल - १९६
  • मेयो - १९७
  • एम्स - ०१
  • खासगी - २६

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighteen more corona victims in Nagpur