अपहरण करून अकरावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; युवकाची मैत्रीण जान्हवीने केले हे...

अनिल कांबळे
शनिवार, 20 जून 2020

नऊ मार्च 2020 मध्ये खुशबू ही ट्युशनला गेली होती. ती दुपारी सीआरपीएफ गेटजवळील पेट्रोलपंपजवळ बसमधून उतरली. त्यावेळी रंजन तेथे पोहोचला. त्याने खुशबूला थांबवले. तिला बाईकवर बसण्यास सांगितले. मात्र, तिने सोबत येण्यास नकार दिला. त्यावेळी रंजनने तिला मोबाईलमध्ये काढलेल्या तिच्या ब्ल्यू फिल्म्स आणि फोटो दाखवले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजाने खुशबू रंजनच्या बाईकवर बसली. 

नागपूर : वस्तीत राहणाऱ्या मित्राने अकरावीच्या विद्यार्थिनीचे ट्युशन क्‍लासमोरून अपहरण करून मित्राच्या रूमवर नेले. तेथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तर बलात्कार करतेवेळी त्यांच्या मैत्रिणीने मोबाईलने व्हिडिओ आणि फोटो काढले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय मुलगी खुशबू (बदललेले नाव) ही धरमपेठमधील एका नामांकित कॉलेजमध्ये अकरावीची विद्यार्थिनी आहे. वस्तीत राहणारा रंजन याच्याशी तिची ओळख झाली. दोघेही फेसबुकवरून संपर्कात होते. दरम्यान, मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर मैत्री वाढली. दोघांच्या भेटीगाठी झाल्या. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यावेळी रंजनने मोबाईलने शारीरिक संबंधाचे मोबाईलने व्हिडिओ आणि फोटो काढले होते.

हेही वाचा - प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे...

नऊ मार्च 2020 मध्ये खुशबू ही ट्युशनला गेली होती. ती दुपारी सीआरपीएफ गेटजवळील पेट्रोलपंपजवळ बसमधून उतरली. त्यावेळी रंजन तेथे पोहोचला. त्याने खुशबूला थांबवले. तिला बाईकवर बसण्यास सांगितले. मात्र, तिने सोबत येण्यास नकार दिला. त्यावेळी रंजनने तिला मोबाईलमध्ये काढलेल्या तिच्या ब्ल्यू फिल्म्स आणि फोटो दाखवले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजाने खुशबू रंजनच्या बाईकवर बसली. 

रंजनने तिला रोहित उर्फ समीर बालेश्‍वर याच्या राजगृहनगरातील घरी नेले. तेथे रोहित आणि जान्हवी हे दोघे बसलेले होते. रंजनने खुशबूशी अश्‍लील चाळे करीत तिचे कपडे फाडले. आरोपी रोहितने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर रोहितनेही तिच्यावर बलात्कार केला. रंजन आणि जान्हवी या दोघांनी खुशबूचे अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो काढले. तिला या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. रंजनने तिला बाईकवर बसवून घरी सोडले.

अधिक माहितीसाठी - साडेतीन लाख द्या, अन्यथा व्हिडीओ करतो व्हायरल... विद्यार्थ्यांनी दिली विवाहितेला धमकी

वारंवार संबंधाची मागणी

अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन रंजन आणि रोहित खुशबूला वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करायला लागले. त्यामुळे खुशबूही त्यांच्या त्रासाला कंटाळली होती. तिने हा प्रकार आजीला सांगितला. आजीने तिला घेऊन एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven year old girl abducted and raped