esakal | ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Engineer commits suicide by hanging himself at home

प्रवीण वंजारी याने पुण्यातील नामांकित कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर कॅम्पसमधून तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत ७ लाख रुपये असलेल्या पॅकेजवर नोकरीला लागला होता. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे तो नागपुरात परतला होता.

‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर  ः पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंजिनीअर असलेल्या युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. प्रवीण रूपराव वंजारी (२३) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण वंजारी याने पुण्यातील नामांकित कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर कॅम्पसमधून तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत ७ लाख रुपये असलेल्या पॅकेजवर नोकरीला लागला होता. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे तो नागपुरात परतला होता. त्याला दोन विवाहित बहिणी असून, एक खापरखेड्याला तर लहाण बहीण नागपुरातील भरतनगरात राहते. 

तो पुण्यातून आल्यानंतर भरतनगरातील बहिणीकडे राहत होता. गेल्या ६ ऑक्टोबरपासून तो न्यू नरसाळ्यातील गिरीराज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहत होता. कंपनीसाठी सध्या तो वर्क फ्रॉम होम करीत होता. तेव्हापासून तो तणावात राहत होता. शनिवारी त्याच्या वडिलांनी फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. तो फोन उचलत नसल्यामुळे त्याच्या वडिलाने त्याच्या मित्राला फ्लॅटवर पाठवले. 

अधिक माहितीसाठी - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा
 

त्याने फ्लॅटचा दरवाजा तोडला असता प्रवीण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच प्रवीणच्या बहिणीला फोन करून माहिती दिली. तसेच १०० नंबरवर कॉल करून पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रवीणने इंग्रजीमधून सहा पानाची सुसाईड नोट लिहिली आहे. ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता. मैं बहोत परेशान हूं. इसलिये मैं आत्महत्या कर रहा हूं’ असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. 
 

टँकरच्या धडकेत युवक ठार

नागपूर : पिपळधरा भागात भरधाव पाण्याच्या टँकरने (एमएच-४०-बीएल-१२४९) युवकाला चिरडून ठार केले. ही घटना सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाची ओळख पटलेली नाही. हिंगणा पोलिसांनी टँकरचालक सुभाष प्रकाश यादव याच्याविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला.
 

दोन गटात राडा

नागपूर : जुन्या वैमनस्यातून खलासी लाइन येथे दोन गटात सशस्त्र राडा झाला. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. फ्रान्सीस जॉन नायडू याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीरज रामआसरे शाहू ,त्याचा मित्र नवीन याच्याविरुद्ध तर शाहू याने दिलेल्या तक्रारीवरून नवीन भैसवारे, गोलू वड्डर, रोशन,योगी भैसवारे याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला.


संपादन  : अतुल मांगे