मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

जितेंद्र वाटकर
Monday, 12 October 2020

नागपूरवरून यवतमाळला जाणाऱ्या एसटीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा रोडवरील आसोला सावंगी जवळ घडली. मदन नामाजी राऊत असे आरोपी एसटी चालकाचे नाव आहे.

टाकळघाट (जि. नागपूर) : सतीश हा मनमिळावू स्वभावाचा होता... तो सर्वांशी मिळून राहायचा... त्याने कधीच कोणाचे मन दुखावण्याचा प्रयत्न केला नाही... दुकानाच्या काही कामानिमित्त बाहेर पडला असता वर्धा रोडवरील आसोला सावंगी नजीक एसटीने मागून धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला... सतीशचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील आदींनी हंबरडा फोडला... सतीशचा मुलगा पाच वर्षांचा तर मुलगी आठ वर्षांची आहे. मुलांनी प्रश्न करताच सर्व शांत झाले अन्ढ ढसा ढसा रडू लागले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मेघश्याम नवघरे (३५, रा. टाकळघाट) याचे टाकळघाट येथे हार्डवेअरचे दुकान आहे. दुकानाच्या काही कामासाठी तो आसोला सावंगीकडे दुचाकी क्र. एमएच ४० एएफ ५४१३ने जात होता. मागून येणाऱ्या नागपूर-यवतमाळ एसटी क्र. एमएच ४० एक्यू ६४४३ने सतीशच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात सतीशच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बघितले असता सतीशचा मृत्यू झाला होता.

जाणून घ्या - सकाळ इम्पॅक्ट! तब्बल २२ किमी पायपीट करणाऱ्या सुनीलला सायकल भेट; मदतीसाठी सरसावले अनेक हात

अपघाताची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मेडिकल नागपूर येथे रवाना केला. त्यानंतर लगेच तपासाची चक्र फिरवित बस ताब्यात घेऊन बस चालकावर गुन्हा नोंद करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

नागपूरवरून यवतमाळला जाणाऱ्या एसटीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा रोडवरील आसोला सावंगी जवळ घडली. मदन नामाजी राऊत असे आरोपी एसटी चालकाचे नाव आहे.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

महिनाभरात दुसरी घटना

एक महिनाअगोदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी चालकास धडक दिल्याने मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत टाकळघाटमधील दुचाकी चालकास मागून एसटी चालकाने धडक दिल्याने सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला व जागीच मृत झाला. दोन्ही घटना एका महिन्याच्या कालावधीत घडल्या. हे अपघात एसटी महामंडळाच्या चालकाच्या निष्कळजीपणामुळे घडल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Wheeler driver killed in ST collision in rural Nagpur