पक्षनिष्ठेपुढे  राज्यपालांचे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांकडे दुर्लक्ष, काय म्हणाले माजी महाधिवक्ता 

राजेश प्रायकर
Wednesday, 14 October 2020

राज्यात अद्याप मंदिरे उघडली नसल्याने भाजपने आज राज्यभर आंदोलन केले. त्याच वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धार्मिक स्थळे खुली करण्याची सूचना करीत हिंदुत्वाची आठवणही करून दिली.

नागपूर  ः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्वाबाबत ज्ञान पाजळल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनीसुद्धा पक्षनिष्ठेपुढे धर्मनिरपेक्ष मूल्यांकडे राज्यपालांचे दुर्लक्ष झाल्याची टीका केली.

राज्यात अद्याप मंदिरे उघडली नसल्याने भाजपने आज राज्यभर आंदोलन केले. त्याच वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धार्मिक स्थळे खुली करण्याची सूचना करीत हिंदुत्वाची आठवणही करून दिली. मुख्यमंत्र्यांना ‘सेक्युलर’ शब्दावरून टोला लगावला. 

या पत्रावरून राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. धर्मनिरपेक्ष असणे किंवा नसणे ही वैयक्तिक बाब आहे. परंतु, देशाच्या राज्यघटनेने भारताचे वर्णन धर्मनिरपेक्ष असे केले आहे. राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे. परंतु, त्यांच्या पत्रातील प्रत्येक शब्द पक्षनिष्ठ मनोवृत्ती दर्शवीत आहे.

सविस्तर वाचा - हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप 
 

धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक मूल्यांकडे राज्यपालांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, असेही अणे यांनी नमूद केले. हिंदू आणि बिगर हिंदूंना समान वागणूक देणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. किंबहुना, घटनेनुसार तसे अभिप्रेत आहे, असेही श्रीहरी अणे म्हणाले. 

राज्य सरकारने मदिरालये उघडली; मात्र मंदिरे उघडण्यास काय अडचण आहे, असा सवाल करून भाजपच्या वतीने मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नवरात्रोत्सवापूर्वी देवालये उघडण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन झेडण्यात येईल, असा इशराही यावेळी देण्यात आला.

नागरिकांच्या रोजगाराचा विचार करून बार आणि रेस्टॉरेंट उघण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूची दुकाने आधीच उघडण्यात आली आहेत. त्याकरिता नियमावली आखून देण्यात आली आहे. हेच नियम मंदिरांना लागू करण्यात यावे. मंदिरातील पुजारी, दुकानदार, फूलविक्रेते यांच्याही रोजागाराचा सरकारने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.  

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex. advocate General Shrihari Ane criticizes the Governor