क्षणिक सुखासाठी विवाहित महिला-पुरुष ठेवतात विवाहबाह्य संबंध अन्‌ विस्कटते संसाराची घडी 

extramarital affair brocked husband and wife relationship
extramarital affair brocked husband and wife relationship

नागपूर : प्रेमाला बंधन नसते तर वय, जात आणि नात्याची सीमा नसते, असे म्हटले जाते. परंतु, सध्या प्रेमाचे रूपांतर आता अनैतिक संबंधात होत आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच प्रेम, असा समज निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुला-मुलींपासून ते विवाहित महिला व पुरुषांपर्यंत हा रोग पसरला आहे. क्षणिक सुखासाठी विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त होत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वाढते वय आणि शरीरात होणारे बदल यामुळे स्वाभाविकच शारीरिक आकर्षण निर्माण होते. सुंदर दिसणे किंवा सौंदर्य जपण्यापर्यंत मुलींसह मुलांचीही चढाओढ असते. त्यांच्या अफेअरमध्ये "प्रेम' हा भावनेचा भाग असतो. "तिच्यासाठी काही पण' किंवा "प्रेमासाठी वाट्टेल ते' असा प्रवास प्रेमीयुगुल तरुण-तरुणींमध्ये असते.

मात्र, आता विवाहित असलेल्या महिला आणि पुरुषांमध्येही शारीरिक आकर्षण वाढत आहेत. त्यामुळे वैवाहिक जीवन डावावर लावून एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना पोलिसांच्या तपासात उघडकीस येत आहेत. विवाहित महिला परपुरुषांच्या शरीरयष्टी, पैसा किंवा ऐशोआरोमावर भाळतात तर विवाहित पुरुषसुद्धा पत्नी, मुलांकडे दुर्लक्ष करीत विवाहित महिलांच्या सौंदर्याकडे आकर्षित होत आहेत. वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम किंवा फोनवरून सतत संपर्कात राहणे किंवा एकमेकांना व्हिडिओ कॉल करण्यापर्यंत मजल विवाहितांची असते. 

पती किंवा पत्नी घरी नसल्याची संधी साधून एकमेकांच्या घरी जाऊन भेटीपर्यंतचा हा प्रवास शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत पोहोचत आहेत. सुरुवातील कुणालाही प्रेमसंबंधाची कुणकुणही लागू न देण्याची खबरदारी महिला व पुरुष घेत असतो. मात्र, अशी वेळ येते की, त्यावेळी याचा परिणाम थेट संसारावर पडायला लागतो. पत्नीला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागते. तेव्हापासून निट असलेल्या संसाराचा गाडा रूळावरून खाली उतरायला लागतो. परिणामतः घटस्फोट किंवा कौटुंबिक हिंचारापर्यंत विवाहबाह्य संबंध पोहोचतात.

40 टक्‍के हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार

उपराजधानीत दोन वर्षांची आकडेवारी लक्षात घेता जवळपास 174 हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी 40 टक्‍के हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. गुन्हेगारांच्या प्रेयसीकडून टीप मिळणे किंवा प्रेयसीला भेटायला गेल्याची खबर मिळाल्यानंतर विरुद्ध टोळीतील गुंडांनी "गेम' केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. 

परपुरुषाची अनैतिक संबंध गुन्हा नाही

विवाहित महिलेने परपुरुषाशी प्रेमसंबंध ठेवणे हा गुन्हा नसल्याचा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. "आयपीसी'चे कलम 497 रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला एकमेकांशी प्रेमसंबंध ठेवू शकतो. तो आता गुन्हा ठरत नाही. या कायद्याचा आधार घेत अनेक जण अनैतिक संबंधाला खतपाणी घालत आहेत.

लिव्ह इन रिलेशनशिप

देशात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास संमती आहे. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लग्नापूर्वीच एकमेकांसोबत एकाच घरात राहतात. त्यांच्यात पती-पत्नीप्रमाण शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मूभा असते. परंतु, आता विवाहित महिला व पुरुषही केवळ प्रेमाखातीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास प्राधान्य देत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. 

जर, जोरू और जमीन

"जर, जोरू और जमीन जोर की, नही तो किसी और की' अशी खूप जुनी म्हण आहे. त्यामुळे संपत्ती आणि महिलांशी शारीरिक संबंध ठेवून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. परंतु, आतापर्यंतचा इतिहास पाहता महिलांच्या उपभोगासाठीच "तांडव' झाल्याचे स्पष्ट होते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com