
विदर्भातील कार्यकर्त्यांमुळे पुन्हा बळ निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात राष्ट्रीय आणि राज्याच्या कुठल्याच नेत्याने शताब्दी गांभीर्याने घेतली नाही. नियोजनही केले नाही. त्यामुळे शताब्दीच्या वर्षाला श्रद्धांजली कार्यक्रमाचे स्वरूप देऊन वेळ मारून नेल्या जात आहे.
काँग्रेसमधील गटबाजी कायम : शताब्दी ‘स्मरण’ही वेगवेगळेच; स्मरणाला श्रद्धांजलीचे स्वरूप
नागपूर : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे डिसेंबर १९२० मध्ये नागपुरात अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने तरी झाले गेले विसरून नेते व कार्यकर्ते एकत्र येतील ही अपेक्षा होती पण तिही फोल ठरली आहे. मुत्तेमवार-ठाकरे आणि पालकमंत्री राऊत-चतुर्वेदी गटाने वेगवेगळ्या ठिकाणी स्मरणाचा कार्यक्रम घेतला आहे. यावरून काँग्रेसमधील गटबाजी कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेसमध्ये तर राऊत गटाचा कार्यक्रम चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आयोजित केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले होते.
येथूनच स्वातंत्र्याच्या चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. सुमारे साठ ते सत्तर वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर काँग्रेसची पडझड सुरू झाली आहे. विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. तो ढासळला आहे.
अधिवेशनाच्या शताब्दीच्या निमित्ताने काँग्रेस भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन मोठा गाजावाजा करेल, विदर्भातील कार्यकर्त्यांमुळे पुन्हा बळ निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात राष्ट्रीय आणि राज्याच्या कुठल्याच नेत्याने शताब्दी गांभीर्याने घेतली नाही. नियोजनही केले नाही. त्यामुळे शताब्दीच्या वर्षाला श्रद्धांजली कार्यक्रमाचे स्वरूप देऊन वेळ मारून नेल्या जात आहे.
शहराध्यक्ष या नात्याने आमदार विकास ठाकरे यांनी देवडिया काँग्रेसमध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार पालकमंत्री ना.डॉ.नितीन राऊत, आमदार ॲड. अभिजित वंजारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दुसरा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार असून यास पालकमंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनीस अहमद,
माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे, सहसचिव नितीन कुंभलकर, नरेंद्र जिचकार, राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे तसेच महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे उपस्थित राहणार आहेत.
Web Title: Factionalism Congress Persists Nagpur Nagpur Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..