#Inspiring : गाई-म्हशी सांभाळून शेतकऱ्यांच्या लेकीची उत्तुंग भरारी

Farmer daughter success story
Farmer daughter success story

नागपूर ः मोठी शाळा.. शाळेतील सोबतच्या मुलींना महागडे खासगी क्‍लास आणि दिमतीला लॅपटॉप आणि स्मार्टफोन अशात, कळमेश्‍वर तालुक्‍यातील हितेषी शास्त्री या शेतकऱ्याच्या लेकीने घरच्या सहा गाई, म्हशी सांभाळुन इयत्ता दहावी सीबीएसई परीक्षेचा अभ्यास केला.

घर कामात आईला मदत करणे, घरच्या गाई, म्हशीचे सगळे पाहणे आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्वतः च नोट्‌स काढून अभ्यास करणे अशी एक हाती लढाई लढून, हितेशीने यशाचे उच्च शिखर गाठले आहे. बोरगांव (खुर्द) ता. कळमेश्‍वर येथील शेतकरी केशव शास्त्री यांची मुलगी हितेषी हिने कुठलाही क्‍लास अथवा कुणाचे मार्गदर्शन न घेता, केवळ बुद्धीमत्ता आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर परीक्षेत तब्बल 95. 60 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.

हितेषी उर्फ अंजली ही कुटुंबातील सर्वांत मोठी मुलगी असून, यावर्षी 10 वी ला भारतीलय विद्या भवन आष्टी येथे शेतकरी कोटयातुन शिकत होती. तिला कोणत्याही विषयाची शिकवणी नसतांना ती घरीच अभ्यास करायची. परिस्थितीची जाणीव असल्याने, हितेषीने कधीही सोबतच्या मुलींचा हेवा न करता आपल्या आर्थीक आणि कौटुंबिक समस्येचा सामना केला आहे.

आईला घरकामात मदत व वडीलांना गाई म्हशीचे पालन पोषणात नियमीत मदत करत तिने फक्त प्रामाणीकपणे अभ्यास केला. हितेषीच्या यशामुळे तिचे आई, वडीलांना गगन ठेंगणे झाले असून, मुलीच्या उज्वल भविष्यासाठी शेतीच्या कामात दुप्पट उत्साहाने सुरूवात केल्याचे केशव शास्त्री सांगतात.

विदर्भातील शेतकऱ्यांची समस्या बिगट झाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच आर्थीक विवंचनेत असलेला शेतकरी समस्येच्या गर्तेत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांनी दहावी, बारावी परीक्षेत मिळविलेल्या उत्तुंग यशाने ग्रामीण भागातही उत्साहाचा व आनंदाचा शिडकावा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com