बॅंकवाले म्हणाले, स्वारी ! "तो' मेसेज जुना आहे हो ! कर्ज देणार नाही, कारण काय तर हे....

संदीप गौरखेडे
रविवार, 14 जून 2020

 

कोरोनाच्या प्रकोपात अनेक व्यवसाय अडचणीत आले. त्यांना दिलासा देण्यासाठी रिर्जव्ह बॅंकेने अठरा ते चोविस महिन्याच्या मुदतीकरीता कमी व्याजदराज कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आखली. त्यासाठी "मेसेज' पाठविण्यात आले. आता ते "मॅसजे' जुने असल्याचे बॅंकेच्या शाखेत सांगितले जात आहे. काय आहे समस्या जाणून घ्या...

कोदामेंढी (जि.नागपूर) : कोरोनाच्या संचारबंदीमुळे सर्वांचेच व्यवसाय अडीच महिन्यांपासून बंद होते. व्यवसायाला चालना मिळावे आणि ते पूर्ववत सुरु करून अशांना धीर देता यावे याकरिता रिजर्व्ह बॅंकेने कर्जधारकांना अठरा ते चोवीस महिन्याच्या मुदतीकरिता कमी व्याजदरात तात्पुरते कर्ज
देण्याची तरतूद केली. मात्र काही बॅंका कमी कर्ज देत असल्याचे पुढे आले आहे. याबाबत कोदामेंढी येथील बॅंक व्यवस्थापकांना विचारणा केली असता, "तो मेसेज जुना आहे; असे ग्राहकांना सांगून बोळवण करीत आहेत.
हेही वाचा : अबब ! माया झाली "बारा' बछडयांची माय !!

कर्जदार करताहेत नाराजी व्यक्‍त
कोविड-19 मुळे डबघाईस आलेल्या व्यावसायिकांना चालना मिळण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाद्वारे शंभर टक्के हमी घेत कसल्याही प्रकारची जमानत न घेता कोलेटरल मुक्त कर्ज वीस टक्के वाटप करण्याबाबत "मेसेज' मोबाईलवर येत आहे. मात्र येथील शाखेतून वीस टक्‍क्‍यांऐवजी दहा टक्के कर्ज वाटप करण्यात येत आहे. कर्जाचे व्याजदर 7.25टक्के इतके असून सहा महिन्यानंतर त्याची परतफेड करणे आहे. कर्जवाटप फक्त सीसी (चालू खाते) धारकांना करण्यात येत असून मुदत कर्जधारकांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने असे कर्जधारक नाराजी व्यक्त करीत आहेत.

आणखी वाचा : धंदयावर बसण्याची धमकी देणारी "लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळयात

तीनशेच्या मुद्रांकांची अट
कोरोनाच्या संचारबंदीमुळे बरेच उद्योग, दुकाने आणि व्यावसायिक अडचणींचा सामना करीत आहेत. मात्र त्यातही कर्ज वाटप करताना एक लाखांपर्यंत कर्जधारकांना तीनशे रुपयांच्या मुद्रांकाची अट असून बॅंकेकडून "चार्जेस' स्वरूपात काही रक्कम कपात केली जात आहे. यामुळे अडचणीत
असलेल्या व्यावसायिक कर्जधारकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. बॅंकेने वीस टक्के कर्ज द्यायला पाहिजे अशी मागणी कर्जधारकांची आहे.

आणखी वाचा : नागपूरचे मिहान देखिल होतेय अनलॉक, हे उद्योग झाले सुरू

कोरोनामुळे व्यवसाय ठप्प
ब-याचशा बेरोजगारांनी उद्योग सुरु करण्यासाठी मुदतीचे कर्ज घेतले आहे. मागील अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असल्याने तेही अडचणीत आहेत. मात्र अशा कर्जधारकांना त्यांचे उद्योग पूर्ववत करण्यासाठी कसल्याही प्रकारचे कर्ज वाटप केले जात नाही.

दहा टक्‍केच वाटप करायला सांगितले
तो मेसेज जुना आहे. तसा मेसेज पाठविणे बंद करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना सांगितले आहे. आम्हाला दहा टक्के इतकेच वाटप करायला सांगितले आहे.
विजय मेहता, व्यवस्थापक बॅंक ऑफ इंडिया कोदामेंढी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The message is old, yes! It will not lend