esakal | दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

A farmer who went to work died of snake bite

महेशच्या मृत्यूनंतर मुलगा संकेत (वय ९) व मुलगी आदिती (वय ७) आहे. मृत महेशच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला असून, महेश मंगर यांच्या कुटुंबीयांकडे जीवन जगण्यासाठी शेती शिवाय दुसरा पर्याय नाही.

दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

sakal_logo
By
अनिल पवार

चांपा (जि. नागपूर) : उमरेड तालुक्यातील कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी कुरडकर येथील रहिवासी महेश नथुजी मंगर (वय ३३) यांचा सर्पदंशाने गुरुवारी शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खापरी कुरडकर येथील रहिवासी महेश नथुजी मंगर हा रविवारी शेतात कामासाठी गेला होता. दरम्यान, सापाने महेश याच्या पायाला तीन वेळा दंश केला. विषारी साप असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

कुटुंबीय व ग्रामस्थांनी महेशला तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तीन चार तासांनंतर त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच शरीरात विषाचा फैलाव झाल्याने चार दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

मृत महेश मंगर यांच्याकडे अडीच एकर जमीन आहे. त्यावर आपले व कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती मृत महेश यांची पत्नी रेणुका महेश मंगर (२७) हिने दिली. महेशच्या मृत्यूनंतर मुलगा संकेत (वय ९) व मुलगी आदिती (वय ७) आहे. मृत महेशच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला असून, महेश मंगर यांच्या कुटुंबीयांकडे जीवन जगण्यासाठी शेती शिवाय दुसरा पर्याय नाही.

अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

संसाराचा गाढा कसा चालवायचा

घरचा कर्ता पुरुष गेल्याने आता संसाराचा गाढा कसा चालवायचा असा प्रश्न रेणुकाला भेडसावत आहे. उत्तरीय तपासणीत सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी विभाग तसेच वन विभागाने तातडीने मदत करण्याची मागणी मृत महेशच्या कुटुंबीयांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे