esakal | दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी 
sakal

बोलून बातमी शोधा

Fire in a house due to gas leakage in Nagpur district

मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीची वेळ असल्याने साधारणतः लोक घरीच असतात. सोमवारी दुपारी दोन ते अडीजच्या दरम्यान राजेश व मनिषा घरीच फराळाचे पदार्थ तयार करीत होते. त्यांची मुले काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती.

दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी 

sakal_logo
By
विजयकुमार राऊत

कामठी (जि . नागपूर):  येरखेडा ग्रामपंचायतीतील घोरपड रोडवरील यशोधरा नगर येथे प्लॉट क्रमांक २८ मध्ये राहणाऱ्या राजेश निळकंठ पाटील यांच्या घरातील सिलिंडरच्या रेग्युलेटर जवळील पाईपमधून गॅसला गळती लागल्याने घराच्या हॉलमध्ये आग लागली. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. राजेश पाटील व त्यांची पत्नी मनिषा मागच्या दारातून घराबाहेर पडल्यामुळे थोडक्यात बचावले. 

मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीची वेळ असल्याने साधारणतः लोक घरीच असतात. सोमवारी दुपारी दोन ते अडीजच्या दरम्यान राजेश व मनिषा घरीच फराळाचे पदार्थ तयार करीत होते. त्यांची मुले काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती.

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

दोघे पतिपत्नीला आग लागल्याचे कळेल तोपर्यंत घरात सर्वत्र धूर पसरल्याने त्यांना कळेनासे झाले. जीव वाचविण्याकरीता मागच्या दारातून घराबाहेर पडले. घराच्या हॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सोफा, दिवाण, टिव्ही, वॉटरफिल्टर, एसी, खुर्च्यासह घराची पिओपीसुध्दा जळू लागल्याने घराच्या वरच्या बाजूने धूर निघत दिसल्याने परिसरातील लोकांत धावपळ उडाली. 

याची सूचना नगर परिषद व पोलिस विभागाला देण्यात आली. नगर पालिकेचे कर्मचारी अमर झंझोटे, आनंद दुरबुळे, जीवन गजभिये आणि त्यांच्या सहकारी जावेद सोबा यांनी सूचना मिळताच त्वरीत न.प.चे अग्निशामक दलाचे वाहन घेवून घटनास्थळ गाठले. आगीचे रौद्ररूप बघता नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी पथकाला सूचना देऊन अग्निशामन वाहनाची मागणी केली.

 नागपूरवरून वाहन पोहचण्याअगोदरच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिस उपनिरिक्षक कांडेकर यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरात असलेले दोन्ही सिलींडर बाहेर केल्याने मोठा अनर्थ टळला. परिणामतः परिसरातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. याकरीता शिपाई गौतम रंगारी, बिट मार्शल तीनचे राष्ट्रपाल दुपारे, चंद्रशेखर रडके यांनी मोलाची भूमिका साकारली. 

मनपाची दोन वाहने उशिरा पोहोचली 

कामठी नगर परिषदेकडे अग्निशमन दलाचे एक वाहन असून कधीकाळी पाण्याची कमतरता भासल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत असते. त्याकरीता नागपूर मनपाच्या अग्निशमन दलाला आणीबाणीच्या वेळी बोलविले जाते. सोमवारी लागलेल्या या आगीची सूचनासुध्दा मनपाच्या अग्निशामन दलाला देण्यात आली होती. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

मनपाच्यावतीने दोन वाहनात अग्निशमन दलाचे मेजर प्रमोद मांडवे, फायममॅन दीपक नेवारे, वाहनचालक योगेश तायडे, कमल तायडे, केशव कोठे, तुषार नेवारे, प्रशांत साळी, कृपाशंकर दिक्षीत घटनास्थळी पोहोचले. मात्र पोहचण्यापूर्वीच न.प.च्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मनपा अग्निशमन दलाला परत जावे लागले.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top