
नागपूर ग्रामीणः यंदा हाताशी आलेले सोयाबीन रोगाने नेले. आता कपाशीचे पीक शेतात उभे आहे. कपाशीला आता युरियाची नितांत गरज आहे. पिकाची चांगली वाढ होण्यासाठी युरीया हे खत वापरले जाते. या काळात शेतातील पिकांसाठी युरियाची मागणी वाढली असून युरिया उपलब्ध नसल्याने तालुक्यातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाईलाजास्तव जास्त किंमत देऊन युरिया खरेदी करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलल्यास टंचाईवर आळा बसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे पिके पिवळी पडली असून पिकांना नत्राची गरज आहे. पीके हिरवीगार होण्यासाठी नत्र युरियाचा माध्यमातून मिळते. त्यामुळे युरियाची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खतांची टंचाई जाणवत आहे. किमान प्रत्येक तालुक्यात ४००ते ५०० टन खताची शेतकऱ्यांना गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृत्रीम टंचाई झाल्याने कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. ज्यांच्याकडे युरिया उपलब्ध आहे, ते जास्त किंमत घेऊन विकत असल्याचे बोलले जात आहे.
अधिक वाचाः ऑनलाइन शिक्षणाचा फायदा किती? आढावाच नाही
ही आहे युरीया न मिळण्यामागची तांत्रिक अडचण
कळमेश्वर(ब्राम्हणी) तालुक्यात सर्वात जास्त रासायनिक, जैविक खते तालुक्यातील शेतकऱ्यांची कळमेश्वर तालुका शेतकी खरेदी विक्री समिती विक्री करीत असून रासायनिक खते उत्पादने करणारे नामवंत कंपनीचे खते, बी बियाणे, कीटकनाशके इत्यादी उपलब्ध करून देते. खरेदी विक्री समितीने या हंगामात कोविड १९ असतानासुद्धा लॉकडाउनमध्ये अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना युरिया २१६८टन उपलब्ध करून दिला. ५००टन युरियाची मागणी ईफकॉ, कृभको, आरसीएफ कंपनीकडे केली असून शेतकरी युरियाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांना युरिया विकताना मिश्रखते, पाण्यात विरघळणारी खते जबरदस्तीने लिंक करून विकण्याचा प्रयत्न खतउत्पादक, कारखानदार करीत आहेत. यामुळे युरियाची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याकडे संबधितांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे. परंतू काही तांत्रिक कारणांनुसार पिकांची वाढ होण्याकरीता पिकांना युरीया देण्याची पद्धत शेतकऱ्यांमध्ये वाढली असून त्याचा पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असल्यांचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचाः कोरोना कुणालाही होऊ शकतो. परंतु मृत्यूच होतो हे मनातून काढून टाका…
गरज पाचशे टन युरीयाची
कळमेश्वर तालुक्यात एकूण पाचशे टन युरीयाची गरज आहे. तालुका खरेदी विक्री समितीने आतापर्यंत ३६७६टन मिश्र खते, १२१०टन फॉस्फेट, ४५४टन पोटॅश आतापर्यंत विकले. खरेदी विक्री समितीकडे आता युरिया उपलब्ध नसून शेतकरी युरिया मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांचा युरियाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी खरेदी विक्री समिती अध्यक्ष बाबाराव कोढे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी युरीयाचा वापर कमी करावा
पारशिवनीत गेल्या काही दिवसात युरीया उपलब्ध नव्हता. आता
उपलब्ध झाला आहे. शेतकरी पिकांना गरज नसताना निव्वळ युरीया देत आहेत.युरीयापेक्षा पोटॅश, डीएपी, १०-२६-२६ आदी युरीयांत काही ठराविक प्रमाणात ही मिश्र खते वापरून पिकांना दिल्यास पिकांना दिल्यास त्याचा फायदा निश्तिच होतो.कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व पुस्तिकेतील सूचनांनुसार मिश्र खतांची ठराविक मात्रा दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. युरीयाचा अती वापर केल्यास पिकावर चुड्डा जाऊ शकतो, असे कृषी अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितलेय.
प्रशासनाने या दुकानांची तपासणी करावी
खरेदी विक्रीत युरीयाची किंमत २२० रूपये इतकी आहे. मात्र खासगी दुकानांमध्ये मनमानी करून युरीयाचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांकडून किंमत आकारली जात आहे. खासगी दुकानदारांकडून युरीया खरेदी केल्यास पावतीही देण्यात येत नाही. प्रशाप्रशासनाने या दुकानांची चौकशी सनाने या दुकानांची चौकशी केल्यास सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
देवेंद्र पन्नासे
साहुली, नागरिकयुरीया न विकण्याची ताकीद
सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आता युरीयाची आवश्यकता आहे. नेमक्या वेळी बाजारातून युरीया गायब झाला आहे.लॉकडाउनच्या काळात मागणी नसल्यामुळे संचालकांनी साठा करून ठेवला होता. कारखानदारांकडून संचालकांना युरीया व्यतिरिक्त दुसरी खते विकण्याची ताकीद देण्यात आली आहे.
जितेंद्र पांडे
ताज कृषी केंद्र संचालक, सावनेर
संपादनः विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.