रिपब्लिकननगरात युवकाच्या खुनाचा थरार; होळीतील वादाचा भडका; बाप-लेकांना अटक

गुरुवारी रात्री जरिपटक्यातील रिपब्लिकननगरात ही थरारक घटना घडली. या प्रकरणात तीनमुले व त्यांच्या बापाला अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री जरिपटक्यातील रिपब्लिकननगरात ही थरारक घटना घडली. या प्रकरणात तीनमुले व त्यांच्या बापाला अटक करण्यात आली आहे.

नागपूर ः होळीच्या दिवळी झालेल्या वादातून युवकावर चकुने हल्ला चढवित त्याची हत्या करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या मृताच्या चुलत भावालासुद्धा जखमी करण्यात आले. गुरुवारी रात्री जरिपटक्यातील रिपब्लिकननगरात ही थरारक घटना घडली. या प्रकरणात तीनमुले व त्यांच्या बापाला अटक करण्यात आली आहे.

रोहित वाघमारे (२५) असे मृताचे तर हर्षद जांभुळकर (३४), भुपेंद्र (३३) शैलेंद्र (२६) आणि देवीदास जांभुळकर (६०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सर्वच रिपब्लिकननगरातीलच रहिवासी असून मृतक गल्लीनंबर १२ तर आरोपी गल्ली नं. ६ येथील आहेत. काही अंतरावरच राहत असल्याने ते परिचितही होते. 

प्राप्त माहितीनुसार आरोपी हर्षद दारूडा असून होळीच्या दिवशीही मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने फिरत होता. रोहितने रोखून बघितल्याचा दावा करीत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वस्तीतील अन्य मंडळी धावून आल्याने प्रकरण निवळले. पण, घटनेचा राग त्याच्या मनात धुमसत होता. आपला सर्वांदेखत अपमान झाला आणि त्याचा वचपा काढण्याच्या जिद्दीने तो पेटला होता.

त्यातच गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रोहित आणि मित्र पीयूष भैसारे यांच्यासोबत दुचाकीवरून जात होता. आरोपींच्या घरासमोरून जात असताना हर्षदने गाडीला आडवे होत त्यांची वाट अडवली. होळीच्या दिवशी झालेल्या भांडणाचा जाब विचारला. त्याचवेळी अन्य आरोपीसुद्धा धावून आले. सर्वांनी मिळून रोहितवर हल्ला चढवत हातबुक्कीने मारहाण सुरू केली. त्याच सुमारास शैलेंद्रने जवळचा चाकू काढून रोहितच्या छातीवर डाव्याभागात भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळून रोहित तिथेच गतप्राण झाला. 

घटनेची माहिती मिळताच रोहितचा चुलत भाऊ ऋषभ घटनास्थळी पोहोचला. देवीदासने लोखंडी रॉडने डोक्यावर फटका हाणून त्यालासुद्धा गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत चारही आरोपींना अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com