धिक्‍कार, धिक्‍कार...नराधम पित्याचे केले पोटच्या मुलीशी कुकर्म

sakal
बुधवार, 22 जानेवारी 2020

आरोपी पित्यास न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने आरोपीस रिमांडवर पाठविले. वाडी परिसरात 2019च्या जानेवारी महिन्यात एका नराधम पित्याने आपल्या पोटच्या मुलीशी जबरदस्तीने कुकर्म केले.

वाडी (जि.नागपूर) : एका नराधम पित्याने स्वतःच्याच मुलीशी जबरदस्तीने कुकर्म केल्याची घटना उघडकीस आली. वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना वाडी परिसरात घडली.
क्‍लिक करा : नागपूर  : तीन बचत गटांचे करार रद्‌द

आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली.

आरोपी पित्यास न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने आरोपीस रिमांडवर पाठविले. वाडी परिसरात 2019च्या जानेवारी महिन्यात एका नराधम पित्याने आपल्या पोटच्या मुलीशी जबरदस्तीने कुकर्म केले. वाडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस सूत्रानुसार पंधरा वर्षीय मुलीसोबत नराधम पिता कुकर्म करीत होता. ही घटना उघडकीस येताच वाडी पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर उभे करण्यात आले. पोलिसांनी सात दिवसांची पोलिस रिमांड मागितली. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलिस रिमांड दिली. घटनेप्रसंगी पीडित बालिकेची आई घरी उपस्थित नव्हती. आरोपीस तीन मुली व एक मुलगा आहे. तो मिस्त्रीचे काम करतो. आरोपी पिता हा कुटुंबासह वाडी परिसरात राहत होता.

क्‍लिक करा : रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारकच; कर सवलत नाही

पीडित मुलीला दिली धमकी
आरोपी पित्याने दुसऱ्या क्रमांकाच्या मुलीसोबतही असेच कृत्य केले होते. घटनेनंतर आरोपीने दोन्ही मुली व मुलाला याबाबतीत न बोलण्याची धमकी दिली होती. पीडित बालिकेलाही जिवानिशी मारण्याची धमकी दिली होती. घरी आल्यानंतर तिच्या आईला हे कळले. पीडित बालिकेच्या आईने वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाठक यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. वाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी देवीदास चोपडे
यांनी आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलिस अधिकारी अविनाश जाईभाए करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father commits adultery with his daughter