रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारकच, कर सवलत नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पालिकेच्या एकापेक्षा जास्त योजना राबविल्यास 10 टक्के तर केवळ एकच योजना राबविल्यास मालमत्ता करातून पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबाबत कर विभागाने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला आज सभागृहात मंजुरी देण्यात आली. महापालिकेने पर्यावरणपूरक शहराच्या दृष्टीने नागपूरची ओळख निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. सौरऊर्जेचा वापर, घरांमध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती करणे या योजना राबविण्यास महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. परंतु, या योजनांनाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

नागपूर : महापालिकेची सौरऊर्जा व इतर अपारंपरिक ऊर्जेचा वापर, घरातील कचऱ्यातून खतनिर्मिती या योजना राबविणाऱ्या मालमत्ताधारकांना करातून सूट देण्याच्या निर्णयावर आज सभागृहाचे शिक्कामोर्तब झाले. मात्र, बांधकाम नकाशा मंजूर करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक असून, त्याबाबत हमीपत्र देणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळणार नसल्याचे महापौर संदीप जोशी यांनी पत्रकारांसोबत बोलताना नमूद केले.

अवश्य वाचा  - मैत्रीणीच्या लग्नात डीजेवर धरला ठेका अन निघाल्या तलवारी

पालिकेच्या एकापेक्षा जास्त योजना राबविल्यास 10 टक्के तर केवळ एकच योजना राबविल्यास मालमत्ता करातून पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबाबत कर विभागाने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला आज सभागृहात मंजुरी देण्यात आली. महापालिकेने पर्यावरणपूरक शहराच्या दृष्टीने नागपूरची ओळख निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. सौरऊर्जेचा वापर, घरांमध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती करणे या योजना राबविण्यास महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. परंतु, या योजनांनाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

परिणामी या योजना राबविणाऱ्या मालमत्ताधारकांना करातून सूट देण्याचा प्रस्ताव कर विभागाने तयार केला होता. हा प्रस्ताव आज सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, या योजनातून रेन वॉटर हार्वेस्टिंगला वगळण्यात आले. बांधकाम नकाशा मंजूर करताना बांधकाम करणाऱ्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. यासाठी बांधकाम करणाऱ्याला हमीपत्र द्यावे लागते. त्यामुळे भविष्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्‍यकच असल्याने ते वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने महापालिकेला सवलतीमुळे कोट्यवधीचे वार्षिक नुकसान सहन करावे लागणार आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no tax exemption, just like Rainwater Harvesting does