मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाचे पाऊल     

अनिल कांबळे 
Saturday, 10 October 2020

आठ वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. मुलगा नेहमी मोबाईलवर खेळताना दिसत असल्यामुळे घरात चिडचिड व्हायची. मुलला मोबाईल दिल्याच्या कारणावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते.

नागपूर : आजकाल मोबाईल म्हणजे लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाला आहे. कुठलेही काम करताना मोबाइलशिवाय ते काम होत नाही, लहान मुले तर अक्षरशः मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मात्र याच मोबाईलच्या वेडामुळे  लहानग्यावरून बापाचे छत्र हरवल्याची घटना नागपुरात घडली आहे.  

आठ वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. मुलगा नेहमी मोबाईलवर खेळताना दिसत असल्यामुळे घरात चिडचिड व्हायची. मुलला मोबाईल दिल्याच्या कारणावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. पत्नीसोबत झालेल्या वादाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज सदर परीसरात उघडकीस आली. जरीन्यम फ्रान्सीस कोलेक्स (४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा - कोरोनाच जबाबदार! केस कापण्याच्या किंमतीत झाली तब्बल दुप्पट वाढ; दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर
 
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीन्यम कोलेक्स हा पेंटीगचे काम करतो. तो पत्नी आणि मुलासह कॅथलिक क्लब, खलाशी लाईन, मोहननगर, शिव मंदिराजवळ राहतो. मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद होता. तो नेहमी मोबाईलवर खेळताना दिसत होता. मोबाईलमुळे त्याच्या डोळ्यावरही परिणाम पडला होता. त्यामुळे मुलाला मोबाईल न देण्याचे त्याने ठरविले होते. 

आईचा लाडका म्हणून महिला मोबाईल 
 
आईचा लाडका असल्यामुळे मुलाला मोबाईल देण्यात येत होता. मोबाईलच्या कारणावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. शुक्रवारी मुलाला मोबाईल दिल्यावरून पती व पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दोघेही रागात होते. रागाच्या भरात पत्नी दरवाज्यात बसली तर जरीन्यमने आपल्या रूममध्ये गेला. 

गळफास घेत केली आत्महत्या 

त्याने घरात लाकडी बल्लीला दुपट्ट्याने  गळफास लावला. बराच वेळ झाल्यानंतर पतीची बडबड बंद झाल्यामुळे पत्नीने घरात जाऊन बघितले. तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तिने मोठ्याने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांच्या मदतीने दुपट्टा कापून पतीला खाली उतरवले आणि उपचारासाठी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

परंतु, डॉक्टरानी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून सदर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father is more diue to over addiction of mobile to his son