esakal | मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करतात अंत्यसंस्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

this is how Parsi community do funeral read full story

काही धर्मांमध्ये दहनविधी करून अंत्यसंकार केले जातात तर काही धर्मामध्ये मृतदेहाला पुरले जाते. पण या जगात असाही एक धर्म आहे ज्यात मृतदेहाला चक्क गिधाडांच्या स्वाधीन केले जाते. हो बरोबर. आम्ही पारसी धर्माबद्दलच सांगत आहोत.  

मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करतात अंत्यसंस्कार 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : 'मृत्यू' या शब्दाचीसुद्धा प्रत्येकाला भीती वाटते. जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी या जगात शाश्वत आहेत असे म्हंटले जाते. पण जन्म घेतल्यानंतर जगत असताना आपला मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहिती नसते. आपल्या मृत्यूनंतर आपण स्वर्गातच गेलो पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणूनच मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारादरम्यान नातेवाईक अनेक प्रकारचे विधी करतात ज्यामुळे मृतात्म्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.

काही धर्मांमध्ये दहनविधी करून अंत्यसंकार केले जातात तर काही धर्मामध्ये मृतदेहाला पुरले जाते. पण या जगात असाही एक धर्म आहे ज्यात मृतदेहाला चक्क गिधाडांच्या स्वाधीन केले जाते. हो बरोबर. आम्ही पारसी धर्माबद्दलच सांगत आहोत.  पारशी धर्मात अंत्यसंस्कार कसे केले जातात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.      

पारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झालं की, मृत व्यक्तीचं शरीर ‘दोखमेनाशिनी’ साठी शरीर एकांतात नेलं जातं. आणि इथे ते व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडतात.

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 
भारतात पारसी लोक हे मुंबई शहरात सर्वात जास्त राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशान भूमी आहे. या स्मशानभूमीला ‘टॉवर ऑफ साइलेन्स’ असं म्हटलं जातं. इथे मृत शरीराला आणून ठेवले जातं आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्यामते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.
 
गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांनी पण याला विरोध केला. तसेच गिधाडांची संख्याही आता कमी झाली. त्यामुळे पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय.

आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधीसाठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता अंत्यविधीसाठी पारसी लोकांना सुरतला जावं लागतं. आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते.

निसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे.

सविस्तर वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

मात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत. काही लोक हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं.

संपादन - अथर्व महांकाळ