"एफडीए' गंभीरता दाखवत नाही, मग ग्राहक हिताच्या संरक्षणाचे काय ?

मंगेश गोमासे
गुरुवार, 30 जानेवारी 2020

नमुन्यांची तपासणी केल्यावरही, त्यावर योग्य कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे 2017-18 या वर्षात जवळपास 991 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 664 नमुने प्रमाणित करून केवळ 77 नमुन्यांचे अहवाल आले असल्याचे समजते. हे सर्व नमुने असुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे संबंधित दुकान, कंपनी वा फर्मवर कारवाई अपेक्षित होती.

नागपूर : ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी दुकानातील मालाचा दर्जा तपासण्यात येतो. हे नमुने तपासणीतून आलेल्या अहवालानुसार त्या दुकानांवर कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र, बऱ्याच प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाकडून गांभीर्य दाखविण्यात येत नसल्याने विभागाकडून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दुकानात अनेकदा ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या मालामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असते. अनेकदा खाद्यपदार्थ व वस्तू घरी नेल्यावर त्या वापरण्या योग्य नसल्याचे दिसून येतात. याचा फटका ग्राहकांना बसतो. अन्न व औषध प्रशासनाकडून दुकानातून तपासणीसाठी नमुने नेल्या जातात. बरेचदा या नमुन्यांची तपासणी होत नसल्याने त्याचे अहवाल प्रलंबित असतात.

- जिच्यावर ठेवला विश्वास तिनेच मारला झाडू...
 

77 नमुने असुरक्षित : बऱ्याच प्रकरणात अहवाल येईना
नमुन्यांची तपासणी केल्यावरही, त्यावर योग्य कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे 2017-18 या वर्षात जवळपास 991 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 664 नमुने प्रमाणित करून केवळ 77 नमुन्यांचे अहवाल आले असल्याचे समजते. हे सर्व नमुने असुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे संबंधित दुकान, कंपनी वा फर्मवर कारवाई अपेक्षित होती. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे दुकानांमधून सर्रास या उत्पादनाची विक्री करण्यात येऊन ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणे सुरू आहे. दुसरीकडे 117 नमुन्यांमध्ये उत्पादनाचा दर्जा कमी असून 71 नमुन्यांचे अहवालच प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कुणाकडे बघावे हाच प्रश्‍न आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने तपासणीसाठी घेतल्या जातात. मात्र, बरेचदा तपासणीचे अहवाल येत नाही. ज्या अहवालात उत्पादनाचा दर्जा असुरक्षित असल्याचे सांगण्यात येते, त्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही.
-शाहिद शरीफ, सदस्य, जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA not serious regarding consumer safty