जिच्यावर ठेवला विश्वास तिनेच मारला झाडू...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

नागपूर : घरात काम करणाऱ्या मोरकरीनने कपाटातील 56 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास करून पळ काढला. ही घटना शांतीनगरात उघडकीस आली. लक्ष्मीबाई पराते असे आरोपी महिलेचे नाव आहे.

नागपूर : घरात काम करणाऱ्या मोरकरीनने कपाटातील 56 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास करून पळ काढला. ही घटना शांतीनगरात उघडकीस आली. लक्ष्मीबाई पराते असे आरोपी महिलेचे नाव आहे.

घरातील काम करण्यासाठी मोलकरीन ठेवताना तिची चौकशी करणे तसेच तिच्याबाबत नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती देणे गरजेचे आहे. अन्यथा मोलकरीन ही केव्हाही घरात चोरी करून पळ काढू शकते. त्यानंतर तिची शोधाशोध करण्यात वेळ गमवावा लागेल. व्हीएचबी कॉलनीत राहणाऱ्या मिनाबाई बुलचंदानी यांच्या घरी लक्ष्मीबाई गेल्या काही महिन्यांपासून कामाला होती. 6 जानेवारीला घरात कुणी नसताना दुपारी दीड वाजता लक्ष्मीने कपाट उघडून दागिने लंपास केले.

कार्यालयात अडीच लाखांची चोरी, लॉकर तोडले
वेस्ट हायकोर्ट मार्गावरील एका कंपनीच्या कार्यालयाचे शटर उघडून चोरांनी रोख 2.55 लाख रुपयांसह चांदीच्या नाण्यांवर हातसाफ केला. या प्रकरणी पोलिसांनी स्नेहनगर निवासी सुशील श्‍यामरत्न दुजारी (46) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

- कुमारी मातांची नक्‍की संख्या किती? काय सांगतो टाटा इन्स्टिट्युटचा अहवाल?

वेस्ट हायकोर्ट मार्गावर लक्ष्मीभवन चौकात मधुमाधव टॉवरच्या चवथ्या माळ्यावर विश्वराज इंफ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. कंपनीचे कार्यालय आहे. 25 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ते कार्यालय बंद करून घरी गेले. मध्यरात्रीला अज्ञात आरोपीने बनावट किल्लीने कार्यालयाचे शटर उघडले. कपाटाचे लॉकर तोडून रोख 2.55 लाख आणि चांदीची नाणी असा एकूण 2,56,863 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी कार्यालयात चोरी झाल्याचे समजले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. बनावट किल्लीने कुलूप उघडण्यात आले होते. यामुळे कार्यालयाची संपूर्ण माहिती असलेल्या एखाद्या व्यक्तीने ही चोरी केल्याचा अंदाज आहे. अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur house maid become thief