ओढ गावाकडची, रस्ता खाचखळग्यांचा, पोटात भूक अन्‌ मनात भीती..

 कोदामेंढी ः गावच्या ओढीने मजलदरमजल करीत निघालेले मजूर
कोदामेंढी ः गावच्या ओढीने मजलदरमजल करीत निघालेले मजूर

कोदामेंढी (जि.नागपूर) : लॉकडाउनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आणि बाहेरील मजूर आहेत त्याच ठिकाणी राहण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने परप्रातांतील मजुरांची मोठी फजिती झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले असल्याने याकरिता प्रत्येक नागरिकांनी सहकार्य केले असले तरी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपताच संधी साधून काही मजुरांची पावले त्यांच्या गावाकडे वळले. पोटात भुकेची आग, ऊन-पावसाची पर्वा न करता आणि सगळे लक्ष घरी असलेले म्हातारे आणि लहान मुलाकडे.

मध्य प्रदेशातील मजुरांची विदारकता
सव्वीस मजुरांचा ताफा मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात असलेल्या किरणापूर (नक्षी) गावाकडे निघाले. अंगावर गाठोड्याचे ओझे पेलवित पायाच्या काड्या करीत मिळेल त्याला वाट विचारत रस्ता तुडवित होते. पहाटेला चार वाजता आम्ही निघालो असून तोस आणि बिस्कुट वर भूक भागवीत आहोत. काय करणार? घरी म्हातारे आणि लहान मुलांची चिंता असल्याने वाट चुकवीत आम्ही निघालो. चेहऱ्यावर पोलिसांची आणि कुणी रोखणार तर नाही ना, याची भीती झळकत होती, अशी विदारकता होती परप्रांतातील त्या मजुरांची.

कुणीच "हमदर्दी' दाखविली नाय..
अकरा मार्चला गहू आणि हरभऱ्याची कापणी करण्याकरिता मजूर आले होते. दरवर्षी या मोसमात मजुरीकरिता येत असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतात झोपड्या उभारून मजुरी करणारे ते मजूर. आठ दिवस काम केले आणि कोरोनामुळे लॉकडाउन झाले. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन संपेल या आशेने होतो, तिथेच थांबलो. शासनाने मजुरांना आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आणि त्यांना खाण्यापिण्याची सुविधा स्थानिक प्रशासनाने करावी, असे निर्देश जरी दिले असले तरी त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही. इथे उपाशी मरण्यापेक्षा घरी गेलेले बरे, अशी त्या आबालवृद्धांची कैफियत. त्यांची व्यथा ऐकून मन सुन्न झाले. माणुसकी दाखवीत ग्रा. पं. सदस्य अतुल लिमजे आणि सरपंच भगवान बावनकुळे यांनी जेवण घातले आणि त्यांना बांधून दिले. गावाकडे काम नसल्याने आणि दोन पैसे कमावण्याच्या हेतूने दरवर्षी मजुरीकरिता येणारे मजूर. त्यात तरुण मुले-मुली, काही युवक, म्हातारे होते. रस्त्यात कुणी जेवणासाठी विचारपूस केली नसून कुठे निघाले, एवढेच विचारीत होते. होते त्याठिकाणीदेखील त्यांना दाणापाणी पुरविण्याची कुणी "हमदर्दी' दाखविली नाही. पुढच्या प्रवासाला निघताना, भगवान तुम्हारा भला करो असे शब्द त्यांच्या तोंडून निघाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com