
दोघेही वेगवेगळ्या पिंजऱ्यात असून एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते. आई ही आई असते, तिला कोणाचीही तोड नसते याचाच प्रत्यय यावेळी आला.
नागपूर : हृदयाला पाझर फुटणार घटना सोमवारी शहरातील सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पाहायला मिळाली. दीड महिन्यांपासून हरविलेल्या पिलाच्या शोधात आई आली अन् पिलाला देखील आई दिसताच राहावलं नाही. दोघेही वेगवेगळ्या पिंजऱ्यात असून एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते. आई ही आई असते, तिला कोणाचीही तोड नसते याचाच प्रत्यय यावेळी आला.
हेही वाचा - समाजमन सुन्न! गणपती-पुळेला जाण्यासाठी निघाले तरुण, पण वाटतेच काळाचा घाला; एकाच...
जवळपास दीड महिन्यांपूर्वी गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना ट्रान्झिट सेंटरमध्ये आणण्यात आले. त्यामध्ये माकडाचे पिल्लू देखील होते. त्यामध्ये एक मादी होती. तिला लहान बाळ होते, याची पुसटशी कल्पनाही ट्रान्झिट सेंटरमधील कर्मचाऱ्यांना नव्हती. बाकी माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावूनच ठेवले होते. त्या पिंजऱ्यात एका पिल्लू आले. तो आईपासून विभक्त झाल्यानं बाकी माकडीण त्याला सांभाळत होत्या. मात्र, तो आईला शोधत-शोधत पिंजऱ्यात अडकला अन् आई दिसताच दोघांचीही एकमेकांना भेटण्याची धडपड सुरू झाली. पिल्लू आईच्या पिंजऱ्यात जाण्यासाठी धडपडत होते. कर्मचाऱ्यांनी पिंजरा उघडताच आई अन् पिलानी एकमेकांना मिठी मारली. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.