शेतातील ताजा भाजीपाला आता सरळ दारासमोर

Fifty farmer groups give the Farm to home service in lockdown period
Fifty farmer groups give the Farm to home service in lockdown period

नागपूर : कोरोनामुळे व्यवहार ठप्प असले तरी पोटाची भूक तर आहेच आणि त्यासाठी जीवनावश्‍यक वस्तुंची खरेदीही करणे आलेच आणि त्याचमुळे बाजारात गर्दी होते आणि सोशल डिस्टंन्सिंगला हरताळ फासला जातो. त्यावर उपाय करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नवी संकल्पना पुढे आणली आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जीवनावश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी ही वाढतानाच दिसते आहे. यातच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत नसल्याचे विविध ठिकाणी दिसून येते. त्यातच भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी हे सर्वश्रृत आहे. या परिस्थितीत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जवळपास 50 शेतकरी गट हे थेट शेतकरी ते ग्राहक थेट विक्री (फार्म टू होम) घरपोच भाजीविक्री करीत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये या माध्यमातून गत मार्चपासून आजपवर तब्बल हजार क्विंटलहून अधिकचा भाजीपाला हा शहरवासियांना शेतकऱ्यानी त्यांच्या घरी पोहचविला आहे.

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी वारंवार शासनाकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यात कलम 144 ही लागू करण्यात आले आहे. परंतु तरीही नागरिक हे भाजीपाल्याच्या निमित्ताने का होईना घराबाहेर पडतांनाच दिसून येत होते. भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मनपा आयुक्तांनी शहरातील मध्यवर्ती कॉटन मार्केट बाजार बंद केला. यानंतर शहरातील विविध नऊ झोनमध्ये मोकळ्या मैदानात भाजी बाजार भरविला. मात्र, याही ठिकाणी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यातील काही बाजार हे बंदही केले. एकंदरीत भाजीबाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले मात्र, त्यावर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. होणारी गर्दी लक्षात घेता कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातील शेतकरी गट यांच्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे सनियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी कृषी उपसंचालक उपरीकर यांच्याकडे सोपविली आहे. ते नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहे. त्यांनी व इतर अधिकाऱ्यांनीही यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गटांशी चर्चा केली. त्यापैकी सुमारे 50 गटांनी यासाठी होकार दर्शविला. यानंतर शेतकरी गटांनी शहरातील मनपाच्या दहाही झोनमधील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या घरी (दारावर) शेतातील ताजा भाजीपाला-फळे फिरते भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला.
कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आज हे फिरते भाजीपाला विक्री केंद्र शहरवासियांना शेतकरी ते ग्राहक थेट विक्री (फार्म टू होम) या तत्त्वावर फळे व भजीपाला उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य भावाने त्यांच्या घरापर्यंत ताजा भाजीपाला व फळे मिळत आहेत. आजवर या माध्यमातून शेतकरी गटांनी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन तब्बल 5 हजार क्विंटलहून अधिकचा भाजीपाला व फळांची विक्री केली आहे. शहरातील नागरिकांकडून या शेतकरी गटांना उर्त्स्फुत प्रतिसादही प्राप्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com