वेळ रात्री अकराची... युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी... मग काय झाले वाचा...

अनिल कांबळे
मंगळवार, 26 मे 2020

अंकुश खोब्रागडे याने तलवारीने मनीष यांच्यावर हल्ला केला. यात मनीष गंभीर जखमी झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमीला मेडिकलमध्ये दाखल केले. इमामवाडा पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

नागपूर : वेळ रात्री अकराची... रस्त्यावर कुणीही नाही... एक पोलिस कर्मचारी युवतीसोबत अंधारात बोलत होता... बराच वेळापासून ते बोलत होते... ते दोघे जण बोलत असल्याचे काही युवकांना दिसले... दमदाटी करून युवतीवर इम्प्रेशन मारण्याच्या उद्देशाने चार ते पाच युवक तेथे आले... युवकाला दमदाटी करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला... मात्र, तो गडी पण पोलिस होता... मग पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीष सुरदास राऊत हे धंतोली पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. रविवारी त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून राऊत हे बाहेर फिरत होते. दरम्यान, ओळखीची युवती त्यांना दिसली. रात्रीच ते युवतीसोबत रस्त्यावर बोलत होते. यावेळी सुनील पाहुणे, अंकुश खोब्रागडे, अजय पाहुणे, अतुल घोष, विद्या पाहुणे व अन्य काहीजण तेथे आले. "युवतीसोबत काय करतो?' असे म्हणत त्यांनी राऊत यांना मारहाण करायला सुरुवात केली.

हेही वाचा - पत्नीने केला पतीचाच गेम; शीतपेयात विष देऊन संपविले 

युवक जास्त असल्यामुळे राऊत काही करू शकले नाही. त्यांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज येताच मेहुणे प्रशांत पाटील, मनीष पाटील, अक्षय पाटील व कमलेश पाटील हे मदतीसाठी धावले. यावेळी सुनील, अंकुश व त्याच्या साथीदारांनी मेहुण्यांनाही मारहाण केली.

अंकुश खोब्रागडे याने तलवारीने मनीष यांच्यावर हल्ला केला. यात मनीष गंभीर जखमी झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमीला मेडिकलमध्ये दाखल केले. इमामवाडा पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक माहितीसाठी -  कोरोनाने केला राजुऱ्याच्या बैलबाजारातील घुंगरांचा आवाजही बंद

दोन्ही गटात हाणामारी

अंधारात मुलगा व मुलगी बोलत असल्याचे पाहुण काही युवक तेथे आले. त्यांनी युवकाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो युवक पोलिस निघाला. उलट त्यानेच खाकीचा धाक दाखवून युवकांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या युवकांनी पोलिस कर्मचाऱ्यांवरच हल्ला चढविला. पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीला काही जण धाऊन आले. यानंतर दोन्ही गटात तुडूंब हाणामारी झाली. 

पोलिस कर्मचारी जखमी

पोलिस व काही युवकांमध्ये रात्रीच्या सुमारास चांगलीच हाणामारी झाली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी सुनील पाहुणे, अंकुश खोब्रागडे, अजय पाहुणे, अतुल घोष, विद्या पाहुणे व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fighting between police and youth at Nagpur