लाथाबुक्‍क्‍या, मारहाण आणि चाकुहल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

पतंग उडविण्यावरून भांडण सुरू असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने आरोपी सूचित चांगलाच संतापला. त्याने किरण यांना ढकलून थापडा मारल्या. वडिलांना मारहाण होत असल्याचे बघून मुलगा महेश याने मध्यस्थीचा प्रयत्न केला. सूचित व त्याच्या दोन्ही साथीदारांनी मिळून महेशला लाथाबुक्कीने मारहाण सुरू केली. हर्षल ब्राह्मणे याने जवळचा चाकू काढून महेशच्या पाठीवर व डाव्या कुशीवर वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला.

नागपूर : पतंग उडविण्याच्या वादातून बुधवारी सायंकाळी सोनेगाव हद्दीतील इंद्रप्रस्थनगरात महाभारत घडले. आरोपी व त्याच्या साथीदारांनी चाकूहल्ला करीत तिघांना जखमी केले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
महेश बोरकर, प्रीत वंजारी, नकुल राऊत अशी जखमी युवकांची नावे असून, ते इंद्रप्रस्थनगरातील नालंदा बुद्धविहाराजवळील रहिवासी आहेत. सूचित चहांदे (22), हर्षल ब्राह्मणे (19) आणि वेदांत (19) अशी आरोपींची नावे असून, तेसुद्धा नालंदा बुद्धविहाराजवळील रहिवासी आहेत. जखमी महेशचे वडील किरण बोरकर (59) संक्रांतीच्या दिवशी काम आटोपून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घरी परतत होते. इंद्रप्रस्थनगरात त्यांना दोन गटांत भांडण सुरू असल्याचे दिसले. पतंग उडविण्यावरून भांडण सुरू असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने आरोपी सूचित चांगलाच संतापला. त्याने किरण यांना ढकलून थापडा मारल्या. वडिलांना मारहाण होत असल्याचे बघून मुलगा महेश याने मध्यस्थीचा प्रयत्न केला. सूचित व त्याच्या दोन्ही साथीदारांनी मिळून महेशला लाथाबुक्कीने मारहाण सुरू केली. हर्षल ब्राह्मणे याने जवळचा चाकू काढून महेशच्या पाठीवर व डाव्या कुशीवर वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. हे चित्र बघून प्रीत महेशला वाचविण्यासाठी गेला असता हर्षलने त्याच्याही पोटावर चाकू भोसकून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी काठीने नकुल राऊतच्या डोक्‍यावर प्रहार करीत त्यालासुद्धा जखमी केले. याप्रकरणी किरण बोरकर यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting for kite